अकोला (प्रतिनिधी)- पोलिस अधीक्षक अकोला जी श्रीधर अपर पोलिस अधीक्षक अकोला प्रशांत वाघुंडे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला सचिन कदम यांनी विशेष पथकासह प्रभात कीड्स ते अमनदीप ढाबा दरम्यान नाकाबंदी करून अकोला येथून सरकारी राशनिंग चा तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्या करीता घेऊन जात असताना पकडला असून आरोपी 1)सदाम खान शब्बीर खान रा. वाशिम बायपास, अकोला व 2) सैयद यासीन सैयद सैफूद्दीन रा. नवाब पूरा अकोला यांचे मालकी ताब्यातुन अंदाजे 15 क्वी. राशनिग तांदूळ सह इतर मुद्देमाल असा एकूण 5,30,400/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन पो. स्टे. जुने शहर, अकोला येथे कलम 3,7 जीवनावश्यक कायदा 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.