अकोला ( प्रती): शुभम तिडके यांची काँग्रेसच्या असंघटित कामगार सेलच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली शुभम तिडके हे बऱ्याच वर्षापासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला तेव्हापासून सदस्य ते एन एस यु आय तालुकाध्यक्ष बाळापुर, बाळापूर विधानसभा महासचिव युवक कांग्रेस इत्यादी पदावर शुभम पंजाबराव तिडके हे कार्यरत होते त्यांच्या या कार्याची दखल घेत मोहम्मद बद्रूजमा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असंघटित कामगार काँग्रेस सेल यांनी शुभम पंजाबराव तिडके यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मान्यतेवरून महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसच्या अकोला जिल्हा हा आयटी व सोशल मीडिया समन्वयक पदी निवड करण्यात आली असंघटित कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी शुभम तिडके यांची निवड करण्यात आली त्यांच्या निवडीने त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे