• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातच केली सोयाबीनची पेरणी

कंपन्या वर पोलीस कारवाई झाली नाही तर रूमणे मारो आंदोलनाचा इशारा

Media Desk by Media Desk
July 14, 2020
in Featured, अकोला, शेती
Reading Time: 1 min read
77 1
0
बोगस सोयाबीन बियाणे
12
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)- जिल्हाभरामध्ये शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीन बियाण्यापैकी अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. याप्रकरणी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली.

अकोला जिल्ह्यात बहुतांश शेती ही कोरडवाहू आहे. त्यामुळे बहुतेक शेतकरी सोयाबीन चे पीक दरवर्षी घेतात. सोयाबीन पट्टा म्हणून ओळखल्या जाणार्‍या अकोला जिल्ह्यात यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. परंतु यावर्षी असंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही. त्यामुळे बियाण्याच्या खर्चासह खते, पेरणीचा खर्च, मशागतीचा खर्च वाया गेला. शिवाय अनेक शेतकऱ्यांचा खरिपाचा हंगाम हातातून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वात मंगळवार 14 जुलै रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री वाघमारे यांना परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली. ज्या कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही, त्या कंपन्यांवर ताबडतोब गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे यांनी केली. सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणात कारवाई करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी वेळकाढूपणा करीत आहेत, शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तसेच पिक विमा अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्या बाबतीतही शेतकऱ्यांची कृषी विभागाच्या विविध कार्यालयांमधून अडवणूक केली जात आहे. या सर्व बाबतीत जिल्हाभरातील कृषी विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन शेतकऱ्यांच्या तक्रारींचे ताबडतोब निरसन करण्याचे निर्देश देण्यात यावे, असेही जिल्हाध्यक्ष संग्रामभैया गावंडे व शिवाभाऊ मोहोड यांनी यावेळी श्री वाघमारे यांना सांगितले.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना फक्त बियाण्यांच्या खर्चाची नव्हे तर खते, पेरणीचा खर्च, मशागतीचा खर्च यासह त्याच्या उत्पादनाचे झालेले नुकसान हा सर्व खर्च नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावा. या मागणीसह येत्या आठवडाभरात सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणात शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई मिळण्यासह शेतकऱ्यांच्या इतर सर्व समस्या सोडविल्या गेल्या नाहीत तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस रुमणे मारो आंदोलन जिल्हा अध्यक्ष संग्राम भैयया गावंडे याच्या मार्गदर्शनात करेल. असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांनी यावेळी दिला.
सोयाबीन पेरण्यासाठी काय काय खर्च लागतो, हे अधिकाऱ्यांना पटवून देण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात यावेळी ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी अधिकाऱ्यांना करून दाखविण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव म्हैसने,सरचिटणीस परीमल लहाने ,राष्ट्रवादी युवक चे पधादीकारी करण दौंड ,अनंत पाचबोले,नरेंद्र घोम, विक्की लाखे, ज्ञानेश्वर ताले, बाळासाहेब तायडे, श्रीराम ताले, प्रथमेश देशमुख, संकेत कुऱ्हे, सागर मोहोड, गोपाल ताले, सुमित तवाडे, ऋषिकेश वाघमारे, शुभम हेमने, सौरभ मुरकुटे, ऋषिकेश मुरकुटे, मो.साबीर मो. फजलू, मोहम्‍मद फजलू पहेलवान, महेश मोरे, कौस्तुभ देशमुख, शिवा साबळे, धीरज सरदार, प्रद्युम्न लोणकर, गौरव मते, अनंत पाचबोले, मंगेश मागटे रामहरी आगळे, गजानन पातोंड, भारत ढाकोलकर, सुनील डाबेराव, अमोल निखाडे, सुनील निलखन यांचेसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानासह इतर सर्व समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करण्याचे आश्वासन यावेळी प्रभारी कृषी अधीक्षक श्री वाघमारे यांनी दिले.अशी माहीती जिल्हा प्रसिध्द प्रमुख मोहन शेळके यांनी दीली

Tags: बोगस सोयाबीन बियाणे
Previous Post

गुणपत्रिकेवर प्रमोटेड कोविड-१९ चा शिक्का म्हणजे सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर उभे केले आहे प्रश्नचिन्ह – अभाविप

Next Post

लग्न समारंभात केवळ 25 जण उपस्थितांना मान्यता आदेशाचा भंग करणा-यांवर फौजदारीसह 25 हजारांचा दंड

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
दंड

लग्न समारंभात केवळ 25 जण उपस्थितांना मान्यता आदेशाचा भंग करणा-यांवर फौजदारीसह 25 हजारांचा दंड

चाचणी

267 अहवाल प्राप्त; नऊ पॉझिटीव्ह, 45 डिस्चार्ज, दोन मयत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.