तेल्हारा (प्रतिनिधी)– स्थानिक मिलिंद नगर मधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची अत्यंत दुरावस्था झाली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे या सभागृहाचे काम परिपूर्ण करण्यात यावेत अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी १३ जुलै ला मुख्याधिकारी व अध्यक्ष नगर परिषद तेल्हारा यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
तेल्हारा शहरातील मिलिंद नगर मधिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या सभागृहात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे .
खिडक्या दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत येथे सर्वत्र केरकचरा पसरला असून जनावरांचा मुक्त संचार असते सभागृहाच्या आत व बाहेर सुध्दा बकऱ्या ,डुकर, सह जनावर वावरत असल्यामुळे सभागृहात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे .सभागृहा बाहेर गवत व नाल्यांनमध्ये पाणी साचल्यामुळे सभागृहाच्या आत व बाहेर सुध्दा घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे हे सभागृह माणसांसाठी बांधलेले आहे कि जनावरांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे . या बाबत युवाक्रांती विकास मंच या सामाजिक संघटनेने आपल्याकडे सदर सभागृहाचे काम कम्पाउंड वॉल सह परिपूर्ण करण्याची मागणी केली आहे त्यांच्या या रास्त मागणीला आमचा पाठींबा असून त्यांनी दिलेल्या मुदतीच्या आत (१५दिवस) सभागृहाचे काम परिपूर्ण करण्यात यावे काम परिपूर्ण न झाल्यास त्यांनी (युवाक्रांती विकास मंच) आंदोलनाचा मार्ग स्विकारल्यास व काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला नगर परिषद अध्यक्ष व मुख्याधिकारी जबाबदार राहतील तरी आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची दुरुस्ती करून कम्पाउंड वॉल सह काम परिपूर्ण करावे अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी व अध्यक्ष यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
निवेदनावर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष सोनू मलीये , भारिप बहुजन महासंघाचे शहर अध्यक्ष विकास पवार , शिवसेना शहर प्रमुख विक्रात शिंदे ,माजी शहर प्रमुख पप्पूसेठ सोनटक्के , भाजपा शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका , प्रहारचे शहर अध्यक्ष मितेश मल्ल , युवासेना जिल्हा प्रवक्ते प्रा. सचिन थाटे , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मो.सलीम मो.युनूस , रिपाइंचे तालुका कार्याध्यक्ष भारत पोहरकार , भाजपा तालुका प्रशिदीप्रमुख रविंद्र शर्मा , नगरसेवक गोवर्धन पोहरकार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत या वेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील खारोडे , शेखर भूजबले , काँग्रेस चे संदीप खारोडे , युवा क्रांती विकास मंच चे अध्यक्ष रामभाऊ फाटकर, स्वप्नील सुरे , जॉन भटकर , इत्यादी उपस्थित होते.












