मुर्तिजापुर (सुमित सोनोने):- जि.प. सदस्या मायाताई संजय नाईक यांनी दि.१० जुलै रोजी मा.प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अकोला यांना निवेदन दिले.त्या निवेदनात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ड यादीमध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांची नावे समाविष्ट झाले. नसुन या विषयानुसार आपले कार्यालयामार्फत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची ड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. परंतु सदर यादीचे अवलोकन केले असता मूर्तिजापूर तालुक्यातील बऱ्याच गरजू लाभार्थ्यांची नावे सदर यादी मध्ये समाविष्ट नसल्याचे निदर्शनास येत आहे. करिता अशा गरजू लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याचे दृष्टिने पुनश्च सर्वे करून यादीमध्ये नावे समाविष्ट नसलेल्या गरजू लाभार्थ्यांची नावे यादी मध्ये समाविष्ट करण्यात यावी ही मागणी त्यांनी यावेळी केली.