अकोला, दि.13– महिला बालकल्याण विभाग, जिल्हापरिषद मार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत जिल्हा कृती समितीची सभा तसेच पोषण अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय अभिसरण समितीची सभा बुधवार (दि. 8) रोजी दुपारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा शल्य चिकित्सक राजकुमार चव्हान, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक , उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास योगशे जवादे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी, पिएनडीटीसी सेलचे विधी सल्लागार, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी व ग्रामिण यांची उपस्थिती होती.
केंद्र शासनाने बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा विस्तार केलेला असुन अकोला जिल्हयाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत Multi-Sector alIntervention and Media Advocacy Outreach कार्यक्रम राबवायचे असून याकरिता सन 2020-21 साठी सर्व विभागांचे समन्वयाने जिल्हा कृती आराखडा तयार करण्यात आला तसेच मंजूरी देण्यातआली.यामध्ये प्रामुख्याने मुलींचे जन्मदर वाढविणे,त्यांचे शिक्षणाला प्रोत्साहन देणे तसेच मुलींचे मत्युदर कमी करणे याविषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी बाळापुर तालुक्यातील अंगणवाडी स्तरावर विविध जनजागृती कार्यक्रम तसेच बेटी जन्मोत्सव साजरा करणे, बेटी बचाव शपथ कार्यक्रम, रांगोळी तसेच विविध प्रकारच्या स्प्र्धांचे आयोजन करण्यात आल्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी सांगितले. अंगणवाडी तसेच प्रकल्पस्त्रावर प्राविण्य प्राप्त् मुलींचे सत्कार करुन राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला.
एकात्मिक बालविकास सेवायोजनेंतर्गत पोषण अभियान कार्यक्रम हे जिल्हयातील विविध विभागांच्या अभिसरण व समन्वयातून राबविण्यात येत असून यामध्ये नागरी व ग्रामिण भागातील स्वच्छता ,गर्भवती स्त्रिया, स्तनदामाता व बालकांची आरोग्य तपासणी, किशोर वयीन मुली व महिलांमध्ये रक्ताक्षयचे प्रमाण कमी करणे, बालकांना पोषण आहार, नियमित उंची व वजन घेणे आदिबाबत चर्चा करण्यात आली. अंगणवाडी सेविका, ए.एन.एम. व आशावर्कर यांना प्रत्यक्ष नियमित घरोघरी भेटी देण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
पोषण अभियान अंर्तगत बालकांचे बुटकेपणा तसेच रक्ताक्षयचे प्रमाण कमी करणेबाबत चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून माहे मार्च 2021अखेर अकोला जिल्हा रक्ताक्षयमुक्त करणे बाबतचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवार यांनी केले. रक्ताक्षयाचे प्रमाण कमी झाल्यास याचे परिणाम कमी वजनाचे बालकांच्या संखेवर तसेच अकोला जिल्हा कुपोषणमुक्त करण्यास चालना मिळेल असेही यावेळी सांगण्यात आले.