अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजनांकरिता जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत १ हजार ९५४ कर्मचारी कार्यरत असून, त्यामध्ये १ हजार ७१ आशा स्वयंसेविकांचाही समावेश आहे.
अकोला शहरासोबतच जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
त्यामध्ये ग्रामीण भागात जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत १ हजार ९५४ आरोग्य कर्मचारी कार्यरत असून, या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्याच्या उपाययोजना करण्याचे काम करण्यात येत आहेत.
त्यामध्ये १ हजार ७२ आशा स्वयंसेविकांचाही समावेश आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली.
ग्रामीण भागात कार्यरत असे आहेत आरोग्य कर्मचारी!
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याकरिता जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत १ हजार ९५४ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी गट अ-७४, वैद्यकीय अधिकारी गट ब-३२, आरोग्य सेवक -८६, आरोग्य पर्यवेक्षक-४, आरोग्य सेविका -१७९, आरोग्य सहायक -४०, आरोग्य सहायिका -२६, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी ४४१ आणि आशा स्वयंसेविका १ हजार ९५४ इत्यादी आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कर्मचाºयांना अशी करावी लागतात कामे!
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाºयांना कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी विविध कामे करावी लागत आहेत. त्यामध्ये गावागावात आरोग्य सर्वेक्षण, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील जोखमीच्या व्यक्तींचा शोध घेणे, घशातील स्रावाचे (थ्रोट स्वॅब) नमुने घेण्यासाठी रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणे, दाखल केलेल्या रुग्णांवर सात दिवस देखरेख ठेवणे, कोरोना निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर संबंधित रुग्णांना घरी सोडणे, रेड झोनमधून गावात आलेल्या प्रवाशांची दररोज आरोग्य तपासणी करणे इत्यादी कामे आरोग्य कर्मचाºयांना करावी लागत आहेत.