अकोला (प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या नुकताच जाहीर झालेल्या प्रदेश कार्यकारिणीत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी अकोट येथील निनाद संजय मानकर यांची निवड महाराष्ट्र प्रदेशचिटणीस पदी फेरनिवड केली आहे .
निनाद मानकर हे गेल्या दहा वर्षांपासून एन.एस .यु.आय व युवक काँग्रेसच्या चळवळीत असून त्यांनी युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस च्या माध्यमातून अनेक विद्यार्थी हिताचे कार्य केले, अनेक आंदोलनाचे नेतूत्त्व केले व पक्षाच्या विविध उपक्रममधे सहभागी होते .त्यांचा प्रवास विद्यार्थी काँग्रेस महाविद्यालयीन अध्यक्ष ते महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस व आता अकोला जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशचिटणीस असा राहिला आहे .निनाद मानकर हे विद्यार्थी काँग्रेस चे पदाधिकारी असतांना त्यांच्या नेतुत्वाखाली महाविद्यालय विद्यार्थी प्रतिनिधी ते विद्यापीठ छात्रसंघ सचिव पदाच्या निवडणुका त्यांनी जिकल्या व गेल्या वर्षभरापासून प्रदेशसचिव पदी सुध्दा चांगले उपक्रम राबविले व अनेक कार्य केले त्याचे कार्य बघून सत्यजित तांबे यांनी त्यांची प्रदेश सचिव पदी फेर निवड केली.
निनाद मानकर यांच्या नियुक्ती ने सर्व मित्र मंडळात आनंदाचे वातावरण असून सर्वांकडून त्यांच्या पुढील राजकीय वाटचाळीस शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.