मूर्तिजापूर (सुमित सोनोने):- तालुक्यातील लाखपुरी परिसरामध्ये दर्यापुर ते मुर्तिजापूर फाट्याजवळ दिनांक १०/०७/२०२० ला दुपारी एक लहानश्या हरणाच्या पिल्लाला कुत्र्याने पकडले असता.ते पिल्लु रोडवर अक्षरक्षा आरडा ओरडा करिता होतो. त्या पिल्याच्या शरिरा मधुन रक्त खुप जात होते.त्यावेळी रोडच्या बाजुला टावरचे काम करणारे पंकज सदाशिव यांना ते पिल्लु दिसले. त्यांनी तात्काळ त्या कुत्र्याच्या तावडीतुन त्या पिलाला जिवदान दिले.त्यांनी त्या पिलाला अंगावर घेतले. कुठलंही स्वतचाची परवा न करता त्या देवदुतांचे कपडी पुर्ण रक्तमय झाले होते. तरी त्यांनी व त्यांचे सहकारी कपिल देशमुख यांनी बाईक ने त्या हरणाच्या पिल्याला त्यांनी तात्काळ त्या पिल्लाला घेऊन मूर्तिजापूर येथे पशु वैद्यकीय रुग्णालय मूर्तिजापुर ते आणून त्यांची ट्रीटमेंट केल्यानंतर त्याला संबंधित वन विभागाच्या सुपूर्त केले.वनविभाग मुर्तिजापूर येथे कॉल केले असता.वनविभागातील चाऊस वनसेवक यांनी येऊन सदर पिल्यास सदर पिल्यास नेण्याची जबाबदारी घेतली.पंकज सुखदेव सदांशिव राहणार राहणार मुर्तीजापुर, कपिल देशमुख घुगशी,जयराम बेठे परिचर पशुवैद्यकीय कर्मचारी,मंगेश टाक,वंचीत तालुका अध्यक्ष संजय नाईक यांनी सुध्दा यावी भेट दिली. पंचायत समिती सदस्य नकुल काटे,अतुल नवघरे , इत्यादींनी परिश्रम घेतले.