बोर्डी (देवानंद खिरकर )- अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथिल पोलिस पाटील यांच्या ताब्यात असलेला अवैध रेतिचा ट्रक्टर पोलिस पाटील यांनी ट्रक्टर मालक यांच्यावर कारवाई होण्याच्या आधिच परस्पर सोडुन देवून पदाचा दुरपयोग केल्या प्रकरणी बोर्डी मधुन देवानंद रमेश खिरकर यांनी पालकमंत्रि व जिल्हाधिकारी अकोला यांचेकडे लेखी तक्रार करुन पोलिस पाटील प्रकाश उगले यांनी पदाचा दूरुपयोग केल्या प्रकरणी चौकशी करून पोलिस पाटील यांना निलंबित करण्याची मागणी केली होती.त्याची पालकमंत्री व जिल्हाधिकारी अकोला यांनी दखल घेवून सबंधीतावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले. व गौणखनिज सबंधीत तहसीलदार,नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी,तलाठी,कोतवाल,पोलिस पाटील,यांच्या विरुध्द जबाबदारी निच्चित करुन कर्त्यव्यात कसूर करणार्या अधिकारी व कर्मचारी यांचे विरुध्द विभागीय चौकशीचे आदेश उपविभागीय अधिकारी अकोट
यांना दिल्यावरुन उपविभागीय अधिकारी अकोट यांनी पत्र क्र /3वि अ/आस्था/कवी/172/2020 दि.1/7/2020 ला तहसीलदार अकोट यांना लेखी पत्र देवून चौकशी करून अहवाल सादर करने बाबत कळविले होते.परंतू अकोट तहसीलदार यांनी सदर प्रकनात कुठलीही चौकशी करुन आज परंत सुध्दा अहवाल सादर केलेला नाही अकोट तहसीलदार यांनी पालकमंत्रि व जिल्हाधिकारी अकोला,उपविभागिय अधिकारी अकोट,यांच्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही.व बोर्ड़ीचे पोलिस पाटील प्रकाश उगले यांचेविरुध्द कारवाई न व्हावी या उद्देशाने प्रकरण थंडबस्त्यात ठेवून टाळाटाळ केली आहे.तरी तहसीलदार राजेश गुरव हे पोलिस पाटील प्रकाश उगले यांना पाठीशी घालत आहेत.करिता वरिस्ठानी लक्ष देवून जबाबदार असणार्या अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुध्द कडक कारवाई करावी अशी मागणी बोर्डी येथिल तक्रारदार देवानंद रमेश खिरकर यांनी पालकमंत्रि व जिल्हाधिकारी अकोला यांचेकडे केली आहे.तरी आता पालकमंत्रि व जिल्हाधिकारी हे प्रकरणात काय कारवाई करतात या कडे अर्जदार यांचे लक्ष लागले आहे.