मूर्तीजापुर (सुमित सोनोने):- येथील मुर्तीजापुर नगरपरिषद मध्ये माजी नगराध्यक्षांच्या फलकावर नाव कायम ठेवण्यात यावे जेणेकरून जुन्या आठवण कायम राहील अशी मागणी माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी पालकमंत्री बच्चू कडू व विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी आरोप केले आहे की मुर्तीजापुर नगरपालिका इमारती स्थलांतरित झाली असून या इमारतीमध्ये एक वर्ष पासून संपूर्ण कामकाज चालू आहे नगरपालिकेच्या सभागृहात जुन्या काळापासून सर्व नगराध्यक्षांचे फलक फोटोसहीत होते परंतु या नवीन कार्यकाळात ते फोटो काढण्यात आले मूर्तिजापुर शहराचा इतिहास कायम राहावा म्हणून फोटो नाव असणे आवश्यक आहे तसेच नवीन नगर परिषद च्या इमारतीवर असलेला भूमिपूजन आतील फलक सुद्धा काढण्यात आलेला आहे. ते फलक सुद्धा परत लावण्यात यावा अनेकांचे भावना दुखत आहे. मुर्तीजापुर नगरपालिका मध्ये आतापर्यंत 19 नगराध्यक्ष होत. आहे आपल्या शहराचा इतिहास कायम राहावा याकरिता चोरीत नगरपरिषदेच्या सभागृहात माजी नगराध्यक्ष यांचे नाव व फोटो लावणे आवश्यक झाले आहे. या सर्वांचा सन्मान ठेवण्यासाठी नगरपरिषदेने तातडीने पुढाकार घेऊन माजी नगराध्यक्ष यांचे फोटो व फलक त्वरित लावावे अशी मागणी करण्यात आली. आहे.यांची प्रतिनिधी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना सुध्दा सादर करण्यात आली आहे.