अकोला (प्रतिनिधी)- अकोला येथील शहर वाहतूक शाखेत कार्यरत पोलीस हवालदार सुधाकर डाबेराव ह्यांनी केलेल्या चोख कर्त्यव्याची दखल दस्तुरखुद्द महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी घेतली असून मुसळधार पावसाची तमा न बाळगता आपले कर्त्यव्य पार पडल्याने ट्विटर आणि फेसबुक वर पोस्ट करून त्यांचे कौतुक केले तसेच त्यांचे कार्यकर्ते पाठवून पुष्पगुच्छ देऊन सत्कार सुद्धा घडवून आणला , ह्या बाबत माहिती अशी की सुधाकर डाबेराव हे अकोला शहर वाहतूक शाखेत कार्यरत असून सन 2018 मध्ये स्थानिक धिंग्रा चौकात आपले कर्त्याव्य पार पाडत असतांना दुपारी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला, तेवढ्यात एक वृद्ध गृहस्थ रस्त्यावर गड्डा पावसाचे पाण्या मूळे न दिसल्या मुळे खाली पडला, त्यांचे मागून एक भरधाव ट्रक येत असल्याचे पाहून चौकात कर्त्यव्य पार पाडत असलेले वाहतूक पोलीस सुधाकर डाबेराव हे धावत आले व त्यांनी त्या वृद्ध गृहस्थाला सावरले त्या मुळे चौकात ट्राफिक जाम लागला असता डाबेराव ह्यांनी न डगमगता मुसळधार पावसात भिजून वाहतूक सुरळीत केली, ह्याचे फोटो कोणीतरी पत्रकार ह्यांनी सोशल मीडिया वर टाकले होते ते त्या वेळी खूप व्हायरल सुद्धा झाले होते हीच पोस्ट दोन तीन दिवसा पूर्वी परत व्हायरल झाल्याने ही पोस्ट महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांचे निदर्शनास आल्याने त्यांनी पोस्ट करून सुधाकर डाबेराव ह्यांचे अभिनंदन केले ह्याची दखल अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर ह्यांनी घेऊन सुधाकर डाबेराव ह्यांचे शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला ह्या वेळी शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके हे हजर होते , ह्या तुन महाराष्ट्राच्या गृह मंत्री अनिल देशमुख ह्यांची पोलिसांप्रति असलेली संवेदनशीलता परत अधोरेखित झाली आहे