• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

२३० अहवाल प्राप्त; २१ पॉझिटीव्ह, ८१ डिस्चार्ज

Media Desk by Media Desk
July 10, 2020
in Corona Featured, Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
चाचणी
17
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१०(जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे २३० अहवाल प्राप्त झाले. त्यातील २०९ अहवाल निगेटीव्ह तर २१ अहवाल पॉझिटीव्ह आले.  आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १८४९(१८२८+२१)  झाली आहे. आज दिवसभरात ८१ रुग्ण बरे झाले. त्यात जिल्हा कारागृहातील ६९ बंदीजनांचा समावेश आहे. आजअखेर ३०८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण १३९१६ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १३४७६, फेरतपासणीचे १५७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २८३ नमुने होते. आजपर्यंत एकूण १३७६५ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ११९३७ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १८४९ (१८२८+२१)आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आज २१ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात २१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सकाळी प्राप्त अहवालात १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व सात पुरुष आहेत. त्यातील तिघे अकोट, तिघे बाळापूर, दोन बार्शी टाकळी, दोन कृषिनगर  तर उर्वरीत तारफैल, कावसा ता. अकोट व पातूर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी प्राप्त अहवालात  आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला व सात पुरुष आहेत. त्यातील चार जण कंवरनगर येथील, तर उर्वरीत बाळापूर, बोरगाव, सिंधी कॅम्प व मोठी उमरी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून देण्यात आली.

 जिल्हा कारागृहातील ६९ जणांसह ८१ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दिवसभरात ८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज दुपारनंतर कोविड केअर सेंटर मधून पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात तिघे बाळापूरचे तर दोघे हरिहर पेठ येथील रहिवासी आहेत, अशी माहिती कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील दोन जण डाबकी रोड येथील रहिवासी असून  उर्वरित वाशीम बायपास, हरिहर पेठ, सिव्हिल लाईन, पातूर व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच जिल्हा कारागृहातील कोविड केअर सेंटर मधील ६९ जण बरे झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे. तथापि, कोरोनातून  बरे झालेले कैदी केवळ कारागृहात स्थापन केलेल्या कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज झाले आहेत. त्यांची कारागृहातच स्वतंत्र व्यवस्था व देखभाल केली जात आहे, असे जिल्हा कारागृह  प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

३०८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत  एकूण १८४९ (१८२८+२१) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९१ जण (एक आत्महत्या व ९० कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १४५० आहे. तर सद्यस्थितीत ३०८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Previous Post

बाहुबली प्रभासचा येतोय नवीन चित्रपट

Next Post

कोविडच्या अतिगंभीर रुग्णांवरील उपचारासाठी आरोग्यमंत्र्यांनी पाठविले प्राणरक्षक इंजेक्शन्स

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
प्राणरक्षक इंजेक्शन्स

कोविडच्या अतिगंभीर रुग्णांवरील उपचारासाठी आरोग्यमंत्र्यांनी पाठविले प्राणरक्षक इंजेक्शन्स

प्लाझ्मा थेरपी

जगातील सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल महाराष्ट्रात; अमरावतीतही सुरुवात

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.