वाडेगांव (डॉ चांद शेख)- वाडेगांव येथील सोफी चौक परिसरातील रहिवासी शेख मुजीबूर रहेमान अब्दुल गफ्फार यांच्या १२ वर्षीय मुलगा शेख मोहिद्दीन शेख मुजीबुर रहेमान याने स्वताच्या वाढदिवासाच्या दिवसी दिनांक ९ जुलै ला सायंकाळी राहत्या घरात दुपट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहीती सामाजीक कार्यकर्ते मोहम्मद अफ्तार ऊर्फ बब्बु भाई यांनी फोन द्वारे वाडेगाव चौकीचे पोलीस कर्मचारी देवीदास येऊल यांना दिली . घटनेची माहीती मिळताच देवीदास येऊल यांनी आपले सहकर्मचारी अशोक नवलकर यांना सोबत घेऊन घटना स्थळ चा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासनी करीता सर्वउपचार रुग्णालय अकोला येथे पाठविले असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही पुढील तपास ए पी आय महादेव पडघन करीत आहे