• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मास्क, सॅनिटायझरच्या साठेबाजी काळा बाजाराला केंद्र सरकारकडून प्रोत्साहन – वंचित बहुजन आघाडी

Media Desk by Media Desk
July 10, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा, अकोला शहर, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
वंचित बहुजन आघाडी
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)- देशात कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बाधित होत असून मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे.अश्यातच मास्क आणि हँड सॅनिटायझरच्या किंमती वर नियंत्रण व चढ्या भावाने विकणाऱ्या विक्रेत्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी ह्या वस्तू जीवनावश्यक कायद्यात असणे बंधनकारक आहे.परंतु ३० जून नंतर ह्या वस्तूचा जीवनावश्यक कायद्यात समावेशाला मुदतवाढ नाकारून केंद्र सरकारने मास्क, सॅनिटायझरच्या साठेबाजी काळा बाजाराला राजमान्यता प्रदान केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी केला आहे.

देशभरात करोनाचा वाढता संसर्ग पाहता मास्क आणि हँड सॅनिटायझरची मागणी वाढली आहे.मागणी वाढल्यामुळे मास्क आणि हँड सॅनिटायझरचा काळाबाजारही सुरू झाला होता.ह्या वस्तूंच्या किंमती अनेक पटीने वाढवल्या गेल्याने केंद्र सरकारने या वस्तूंचा समावेश जीवनावश्य्क कायद्यात केला होता. तसेच त्यांच्या किंमती देखील निश्चित केल्या होत्या. त्यानुसार हँड सॅनिटायझरच्या २०० मिलीच्या बाटलीची किरकोळ किंमत १०० रुपयांपेक्षा अधिक नाही. तसेच इतर आकाराच्या बाटल्यांच्या किंमतीही याच स्तराच्या ठेवण्यात आल्या होत्या.जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत २ आणि ३ प्लाय मास्कमध्ये वापरण्यात येणाऱ्या फॅब्रिकची किंमत १२ फेब्रुवारी २०२० रोजी जेवढी होती तेवढीच ठवण्यात आली होती. २ प्लाय मास्कची किरकोळ किंमत ८ रुपये आणि ३ प्लायची प्लायची किंमत १० रुपयांपेक्षा अधिक नसेल हे निश्चित झाले होते. या किंमती ३० जून २०२० पर्यंत संपूर्ण देशभर लागू करण्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जाहीर केले होते.त्यानुसार मास्क आणि हँड सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक उत्पादनांच्या यादीत समावेश करण्यात आला होता. करोना विषाणूच्या जलद प्रसारानंतर या दोन्ही उत्पादनांची कमतरता आणि काळाबाजार लक्षात घेता सरकारने हे पाऊल उचलले होते. जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत राज्य सरकारांना या उत्पादनाच्या किंमती निश्चित करण्याचे अधिकार आहेत.या उत्पादनावर असलेल्या एमआरपीपेक्षा अधिक किंमत आकारल्यास संबंधित विक्रेत्याने मास्क आणि हँड सॅनिटायझरच्या निश्चित केलेल्या किंमतीपेक्षा अधिक पैसे घेतल्यास अशा विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई केली करता येते.तसेच दोषी आढळल्यास अशांवर ७ वर्षांची शिक्षा आणि दंड होऊ शकतो.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

परंतु देशात मोठ्या संख्येने नागरिक बाधित होत असताना आणि मृत्यू पावत असताना ह्या वस्तूचा समावेश कायम जीवनावश्यक वस्तूच्या यादीत असणे गरजेचे होते.कारण सरकारी पातळीवर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरणे व हँड सॅनिटायझरची वापर करा असा प्रचार केला जात आहे.जे नागरिक मास्क चा वापर करीत नाही, त्यांचे वर दण्डात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.साथ रोग नियंत्रण करणे ही सरकारची देखील जबाबदारी आहे. नागरिकांना दंड आकारून सरकार आपल्या जबाबदारी पासून पळ काढू शकत नाही.विद्यमान केंद्र सरकार हे नफेखोर आणि काळ बाजार करणा-यांचे समर्थक आहे.म्हणून त्यांनी ३० जून नंतर ह्या वस्तूचा जीवनावश्यक कायद्यात समावेशाला मुदतवाढ नाकारून मास्क, सॅनिटायझरच्या साठेबाजी काळा बाजाराला प्रोत्साहन दिले आहे.हा निर्णय नागरिकांच्या जीविताशी खेळणारा असून केंद्र सरकारने मास्क, सॅनिटायझर व इतर वैधकीय साहित्य ह्याचा समावेश कायम स्वरूपी जीवनावश्य्क वस्तूच्या यादीत ठेवावा अशी मागणी देखील वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.

Tags: वंचित बहुजन आघाडी
Previous Post

राष्ट्रीयत्व, धर्मनिरपेक्षता व नागरिकत्व या विषयांवरील धडे अभ्यासक्रमातून वगळण्याचा सीबीएसईचा निर्णय उघड राष्ट्रद्रोह – राजेंद्र पातोडे

Next Post

वाढदिवसाच्या दिवशी १२ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
आत्महत्या

वाढदिवसाच्या दिवशी १२ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

ईपीएफओ

प्रोव्हिडंट फंडातून पैसे काढण्यासाठी कागदपत्रे सादर करण्याची नाही गरज

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.