मुर्तिजापुर (सुमित सोनोने):- तालुक्यामधील लाखपुरी सह लाखपुरी सर्कल मधील शेतीची दुबार पेरणी , काही भागात पिकाचे नुकसान तर काही भागात शेती सुध्दा खरडुन गेली, तर काही भागात अति पाऊसामुळे बियाने उगवलेच नाही , तर काही शेतक-यांन बियाने बोगस निघाल्यामुळे निघाले नाही.
तर काही भागात ढगफुटी पाऊसामुळे शेतक-यांनचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामध्ये कपासी , सोयाबीन , तुर मुग , उडीद . तिळ या पिकांचा समावेश आहे . दंगडफुटीच्या पाऊसामुळे बहुतांश शेतक-यांनचे नुकसान झाले आहे त्याबाबत चे निवेदन दि. ०८-०७-२०२० रोजी निवेदन उपविभागीय अधिकारी मुर्तिजापुर , तहसिलदार साहेब मुर्तिजापुर , जिल्हाधिकारी अकोला , पालकमंत्री अकोला यांना निवेदनाच्या प्रती पाठविल्या आहे. सदर निवेदन देतांना मिनल नवघरे पं. स. सदस्या लाखपुरी व नकुल काटे पं. स. सदस्य भटोरी व माजी महासचिव वंचीत सचिन दिवनाले , प्रसिध्दी प्रमुख अतुल नवघरे , प्रसिध्दी प्रमुख नाजुकराव खांडेकर ई. निवेदन देतांना उपस्थीत होते. शासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
_____________
मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी सर्कल व सिरसो सर्कल तसेच संपुर्ण तालुक्यातील शेतक-यांचे पिकांची झालेल्या नुकसानीचा सर्वे करुन शेतक-यांना तातकाळ मदत द्या जेणे करुन शेतकरी हा जगेल शेतकरी जगेल देश जगेल
संजय नाईक (माजी तालुका अध्यक्ष वंचीत मुर्तिजापुर)
______________
लाखपुरी सह लाखपुरी सर्कल मध्ये बहुतांश भागात दुबार पेरणी , पिक नुकसान , खरडुन गेलेले , अति पाऊसामुळे बियाने दबुन झालेल्या नुकसानीचा सर्वे करण्याचा अद्याप केलेला नाही . प्रशासनाने शेतक-याचा अंत न पाहता कतात्काळ सर्वे करुन शेतक-याना आर्थिक मोबदला द्यावा..
नकुल काटे (प.स. सदस्य भटोरी)
___________
मी माझ्या शेतात १० एकर शेतीची पेरणी केली त्यामध्ये कापुस पेरले ३० तारखेला ढगफुटी पाऊसामुळे बियाने १२ दिवस होवुन निघालेच नाही . म्हणुन शेवटी पुर्ण शेत पेरावे लागेल परन्तु अद्याप शेतीचा सर्वे करण्यास कोणी आले नाही. शेतीचे पिक मोठे झाल्यावर महसुल विभाग पाहणी करण्यास येईल का व मदत मिळेल याची सुध्दा शाशवंती नाही कारण लाखपुरी सर्कल मध्ये ५ वर्षापासुन मदत मिळत नाही यांचे कारण गुलदस्तात आहे.
महादेव नवघरे(शेतकरी लाखपुरी)