मूर्तीजापुर (सुमित सोनोने):- कोरोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाऊल उचलून एका उपक्रमाद्वारे शहरातील
नगराध्यक्षा निघाल्या शहराबाहेर संभाव्य रुग्णांच्या तपासणीसाठी वार्डात फिरत आहे. मूर्तिजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमण मुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात देशात निर्माण झालेली आहे. वास्तव पाहता नागरिकांनी अजिबात न घाबरता सर्व नियमांचे पालन केले तर हे महामार्ग आपल्याजवळ येणार नाही.
असे आवाहन करून नगराध्यक्षा मोनाली कमलाकर गावंडे स्वतः वार्डात फिरून नागरिकांचे तापाचे प्रमाण पाहणे पल्स रेट पाहणे तसेच ऑक्सिजन लेवल पाहून श्वास घेण्याची क्षमता बद्दल तपासण्या करण्यास सहकार्य केले मुर्तीजापुर नगर परिषद च्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी या आरोग्य तपासणी योजनेअंतर्गत सहभागी झाले आहे. नागरिकांनी स्वतः पुढे आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी सर्वांनी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपली तपासणी स्वतः करून घ्यावी जेणेकरून महामारी आजार आपल्यासमोर निर्माण होणार नाही येणारा संकट टाळता येईल म्हणून समस्त नागरिकांनी तपासणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आव्हान नगराध्यक्षा मोनाली कमलाकर गावडे यांनी केले आहे. सदर अभियानात भाजपाचे शहर बुथ प्रमुख कमलाकर गावंडे सुध्दा सहकार्य करत आहे.