तेल्हारा (प्रतिनिधी)- स्थानिक मिलिंद नगर मधिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात गुर ,ढोर, बकऱ्या ,डुकरान सह जनावरांनचा मुक्त संचार असल्यामुळे या सभागृहात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून सर्वत्र दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .हे सभागृह माणसांसाठी बांधले कि जनावरांनसाठी असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आज ९ जुलै ला युवाक्रांती विकास मंच या सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांना निवेदन सादर करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची दुरुस्ती करून स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली १५ दिवसाच्या आत तसे न झाल्यास युवा क्रांती आंदोलन छेडणार असा इशारा सुध्दा देण्यात आला आहे .
तेल्हारा शहरातील मिलिंद नगरा मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह आहे .या सभागृहाची अत्यंत दुर्दशा झाली असून सभागृहात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे येथे सर्वत्र केरकचरा पसरला असून जनावरांचा मुक्त संचार असते सभागृहाच्या आत व बाहेर सुध्दा बकऱ्या ,डुकर, सह जनावर वावरत असल्यामुळे सभागृहात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे स्वच्छता गृहाची दुरावस्था झाली असून खिडक्या दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत .सभागृहा बाहेर गवत व नाल्यांनमध्ये पाणी साचल्यामुळे सभागृहाच्या आत व बाहेर सुध्दा घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे हे सभागृह माणसांसाठी बांधलेले आहे कि जनावरांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे तरी आपण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाची संपूर्ण दुरुस्ती करून स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी युवा क्रांती विकास मंच या सामाजिक संघटनेने मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांना निवेदन देऊन केली १५ दिवसाच्या आत सभागृहाची दुरुस्ती व स्वच्छता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुध्दा युवाक्रांती ने निवेदनातून दिला आहे. निवेदनावर युवाक्रांती विकास मंच चे सस्थापक अध्यक्ष रामभाऊ फाटकर ,तालुका अध्यक्ष अनंत मानखैर, शहर अध्यक्ष मोहन श्रीवास , राहुल देशमुख , स्वप्नील सुरे, गिरधारी श्रीवास ,अजाबराव सोनटक्के , सुनील गोल्लर, विठ्ठल ठाकरे , गणेश भटकर ,प्रफुल्ल देशमुख , कृष्णा सोनटक्के , विशाल सोनटक्के , अर्जुन श्रीवास , रवी खारोडे, गणेश सोनटक्के , विकास सोनटक्के , अजय खोले , पुंडलिक मानकर इत्यादी युवाक्रांती विकास मंचच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .