मूर्तिजापूर (सुमित सोनोने)- : येथील कॉलनी स्टेशन विभागातील राजेंद्र हांडे यांच्या कडे भाड्याने राहत असलेल्या गजानन गवई यांना घर खालीकरण्याच्या वादातून राजेंद्र हांडे यांनी ३ जुलै रोजी जातीवाचक शिवीगाळ करुन कांड करण्याची धमकी दिली.
गजानन गवई हे राजेंद्र हांडे यांच्या घरी ७ महिन्यांपासून भाड्याने राहता लॉकडाऊन काळाचा फायदा घेऊन हांडे यांनी तीन महिन्यांत गवई यांचेकडून ठरल्यापेक्षा अव्वाच्या सव्वा भाडे वसूली केली. ही भाडेवाढ जूजबी असल्याचे बाब गजानन गवई यांनी घरमालक हांडे यांच्या वारंवार लक्षात आणून दिली. यावर हांडे यांनी भाड्यासाठी तगादा लावत लॉकडाऊन काळात घर खाली करायला सांगीतले असता; दुसरे घर मिळेपर्यंत अवधी द्या मी एक महिन्यात आपले घर खाली करुन देतो असे सांगितले परंतु राजेंद्र हांडे याचा पारा चढला आणि गजानन गवई यांना अतीशय खालच्या दर्जात अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करुन आठ दिवसांत कांड करण्याची धमकी दिली. यासंदर्भात गजानन गवई यांनी ३ जून रोजीच मानव अधिकार, पोलीस अधीक्षक, पोलीस उपसंचालक यांच्याकडे अॉनलाइन तक्रार दाखल केली आहे. ती तक्रार मूर्तिजापूर शहर ठाणेदार शैलेश शेळके यांनी ५ जुलै रोजी दाखल करुन घेतली असून आरोपी राजेंद्र हांडे याचे विरुद्ध अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१) (आर)(ड ), ३(२) (आर ए) ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले हे करीत आहेत.