• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

३७४ अहवाल प्राप्तः ३९ पॉझिटीव्ह, २८ डिस्चार्ज

Media Desk by Media Desk
July 6, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
corona
12
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.६-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ३७४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३३५ अहवाल निगेटीव्ह तर ३९ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १७४२  झाली आहे. आज दिवसभरात २८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजअखेर ३६७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण १२७०६ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १२२९९, फेरतपासणीचे १५२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २५५ नमुने होते. आजपर्यंत एकूण १२६१२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १०८७० आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १७४२ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आज ३९ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात ३९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सकाळच्या अहवालात ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात १७ महिला तर १६ पुरुष रुग्ण आहेत. ते बाळापूर येथील ११, बोरगाव मंजू येथील पाच, जेल क्वार्टर येथील तीन, पोळा चौक येथील दोन, सिंधी कॅम्प येथील दोन तर उर्वरित ज्ञानेश्वर नगर, मोठी उमरी, वानखडे नगर, कैलास नगर, आदर्श कॉलनी, वाशीम बायपास, महान, अकोट, खामगाव बुलडाणा व मालेगाव वाशीम येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळच्या अहवालात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला(१३ महिन्यांच्या बालिकेसह) व तीन पुरुष आहेत (एक चार वर्षे व एक आठ वर्षीय बालकांसह) या रुग्णांपैकी चार जण गिता नगर येथील तर अन्य नानक नगर व कच्ची खोली येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत ,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

२८ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० तर कोविड केअर सेंटर येथून १८  अशा एकूण २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज दिलेल्या १० जणांपैकी  चार जण हे सिंधी कॅम्प येथील, दोन जण ज्ञानेश्वर नगर, तर उर्वरीत  आदर्श कॉलनी, शिवसेना वसाहत, बाळापूर व अकोट येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज दिलेल्या १८ जणांपैकी आठ जण हरिहर पेठ येथील, सात जण बाळापूर येथील तर  दोन जण पातूर व एक जण  सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहे.

३६७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत  एकूण १७४२ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ८९ जण (एक आत्महत्या व ८८ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १२८६ आहे. तर सद्यस्थितीत ३६७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Previous Post

आ अमोल मिटकरी यांच्या पुढाकाराने पुरात वाहून मृत झालेल्या शेतमजूर महिलेच्या कुटूंबाला चार लाखाची मदत

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज एमआयडीसीच्या महाजॉब्स पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन; ‘ही’ आहेत Mahajobs ची प्रमुख वैशिष्ट्ये

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज एमआयडीसीच्या महाजॉब्स पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन; ‘ही’ आहेत Mahajobs ची प्रमुख वैशिष्ट्ये

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज एमआयडीसीच्या महाजॉब्स पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन; ‘ही’ आहेत Mahajobs ची प्रमुख वैशिष्ट्ये

टाटा उद्योग

कोरोनाशी लढताना टाटा उद्योग समूह शासनासोबत संपूर्ण ताकदीने उभा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.