अकोट(देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील ग्राम वडाळी देशमुख येथील बोर्दि नदीला अचानक आलेल्या पूरामुळे शेतमजुर सुधाकर वाढोकार यांची पत्नी ह्या शेतातून येत असतांना पाण्यात पाय घासरुन पडून वाहून गेल्याने त्यांचा दुदैवी मृत्यु झाला होता. ही वार्ता आमदार अमोल मिटकरी यांना समजताच त्यांनी पुढाकार घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती देऊन 2 दिवसात तात्काळ 4 लाख रुपयेचा निधी चेकद्वारे आज त्यांच्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आला.यावेळी आमदार अमोल मिटकरी ठाणेदार फड, तहसीलदार गिते,शासकीय कर्मचारी,व नागरिक उपस्थित होते.