बोर्डी(देवानंद खिरकर )- ग्राम पनोरो येथिल नागरीकांनी पुल दुरुस्ती सबंधी आमदार सावरकर यांचेकडे मागणी केली होती.व अवर अकोला न्यूज़ने सदर वृत्त प्रकाशीत केले होते. याचीच तात्काळ दखल घेत काल आमदार रणधीर सावरकर यांनी भरपावसामध्ये पनोरी येथील पुलाची सबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ऑन दी स्पॉट पाहणी करून नागरिकांच्या हितासाठी दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते.परिणामी आज प्रत्यक्षात पुलाच्या दुरुस्तीसाठी संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून जे सी पी द्वारे गाळ काढण्यास प्रारंभ झाला असुन काम प्रगतीपथावर सुरू आहे.त्याबद्दल आमदार रणधीर सावरकर यांचे पनोरी येथिल गणेश बुटे,प्रभाकर बुटे,प्रविण फुकट,बाळू भदे,विलास बुटे,व गावकरी मंडळी यांनी मनापासून आभार व्यक्त केले आहे.