• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

३५४ अहवाल प्राप्तः ४८ पॉझिटीव्ह, ३३ डिस्चार्ज, चार मयत

Media Desk by Media Desk
July 4, 2020
in Featured, Corona Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
चाचणी
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.४-आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे  १८५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३०६ अहवाल निगेटीव्ह तर ४८ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १६६५  झाली आहे. आज दिवसभरात ३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर चार रुग्णाचा उपचार घेतांना मृत्यू झाला आहे. आजअखेर ३२२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण १२०६९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ११६७३, फेरतपासणीचे १५० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २४६ नमुने होते. आजपर्यंत एकूण ११९९२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १०३२७ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १६६५ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

आज ४८ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात ४८  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सकाळी प्राप्त अहवालात ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १५ महिला व ३२ पुरुष आहेत. त्यातील १४ जण पातूर येथील, १२ जण बाळापूर येथील  खोलेश्वर येथील चार जण, अकोट येथील चार जण, लहान उमरी,  डाबकी रोड व जीएमसी होस्टेल येथिल प्रत्येकी दोन जण तर बार्शी टाकळी, गिरीनगर, गंगानगर, अकोट फैल, वाशीम बायपास, आदर्श कॉलनी व वाशीम येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी प्राप्त अहवालात एकाच रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. हा पुरुष रुग्ण सरस्वतीनगर अकोट येथील रहिवासी आहे,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

३३ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार तर कोविड केअर सेंटर मधून २९ अशा एकूण ३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण हे  श्रीवास्तव चौक, शिवाजीनगर, हरिहर पेठ व पारस येथील रहिवासी आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून कळविण्यात आले. तर कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण हे सहा जण आंबेडकर नगर येथील, पाच जण अकोट फैल येथील,  जुने शहर, अशोक नगर व राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी तीन जण, हरिहर पेठ येथील दोन जण तर  कौलखेड, दगडीपुल, सिंधी कॅम्प,  बसेरानगर, अकोट, हिंगणा, भिमनगर येथील रहिवासी आहेत,असे कोविड केअर सेंटर मधून कळविण्यात आले आहे.

चौघांचा मृत्यू

दरम्यान आज चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  त्यात तिघे पुरुष असून एक महिला आहे. त्यातील एक जण बाळापूर येथील ३६ वर्षीय व्यक्ती आहे. हा व्यक्ती २३ जून रोजी दाखल झाला होता. त्याचा काल (दि.३) रात्री मृत्यू झाला. अन्य एक ७२ वर्षीय व्यक्ती अकोट येथील असून हा व्यक्ती दि.२ रोजी दाखल झाला होता. तर अन्य आणखी एक ७२ वर्षीय व्यक्ती  खैर मोहम्मद प्लॉट येथील असून हा व्यक्ती २९ जून रोजी दाखल झाला होता. या दोघांचा आज पहाटे मृत्यू झाला. दरम्यान सायंकाळी आणखी २४ वर्षीय महिला रुग्ण दगावली. ही रुग्ण महान बार्शीटाकळी येथील रहिवासी आहे.  ती  दि.३० जून रोजी दाखल झाली होती. तिचा आज दुपारी उपचार सुरु असतांना मृत्यू झाला,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

३२२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत  एकूण १६६५ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ८८ जण (एक आत्महत्या व ८७ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १२५५ आहे. तर सद्यस्थितीत ३२२  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Previous Post

पीएम मोदींच्या लेह रुग्णालयातील ‘त्या’ छायाचित्रांवरून अखेर लष्कराने केला खुलासा!

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मेडिकल टास्कफोर्सचा आढावा

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
district collector jitendra papalkar

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मेडिकल टास्कफोर्सचा आढावा

मुख्यमंत्री

कार्यपद्धती निश्चित करणे सुरु – हॉटेल्स असोसिएशनसमवेतच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.