अकोला,दि.३- माजी सैनिकी मुला/मुलींचे वसतीगृह, अकोला येथे तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधनावर कंत्राटी पद्धतीने विविध पदावर माजी सैनिक/माजी सैनिक विधवा/माजी सैनिक पत्नी प्रवर्गातून नेमणुक करण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
सैनिकी मुलांच्या वसतीगृहाकरीता सहाय्यक वसतीगृह अधिक्षक या पदासाठी माजी सैनिक प्रवर्गातील १० वी व एमएससीआयटी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक असून या पदाचे प्रति माह मानधन रु ९९०२/- राहील. तसेच मुलांच्या वसतीगृहातील चौकिदार(निवासी), सफाईवाला व माळी या पदाकरीता माजी सैनिक/सिव्हील प्रवर्गासाठी इयत्ता आठवी पास शैक्षणिक पात्रता आवश्यक असून चौकिदार(निवासी) पदाचे मानधन प्रती माह रु. ८९११/-, सफाईवाला या पदाकरता मानधन प्रती माह रु. ५६५८/- तर माळी या पदाकरीता मानधन प्रती माह रु. ४९२०/- राहील.
सैनिक मुलींचे वसतीगृहाकरीता अशासकीय वसतीगृह अधिक्षका(निवासी) पदासाठी माजी सैनिक विधवा/पत्नी प्रवर्गातील १० वी पास, एमएससीआयटी व इंग्रजी, मराठी प्रतीशब्दमिनीट ३० शैक्षणीक पात्रता असणे आवश्यक असून या पदाचे मानधन प्रती माह रु. १२८७२/- प्रमाणे राहील, अशासकीय वसतीगृह अधिक्षका पदासाठी माजी सैनिक विधवा/पत्नी प्रवर्गातील १० वी पास व एमएससीआयटी शैक्षणीक पात्रता असणे आवश्यक असून या पदाचे मानधन प्रती माह रु. ९९०२/- प्रमाणे राहील. तसेच मुलींचे वसतीगृहातील चौकिदार(निवासी), व माळी या पदाकरीता माजी सैनिक/सिव्हील प्रवर्गातील तर सफाईवाली या पदाकरीता सिव्हील प्रवर्गातील आठवी पास शैक्षणीक पात्रता असणे आवश्यक असून चौकीदार(निवासी) पदाचे मानधन प्रती माह रु. ८९११/-, सफाईवाला या पदाकरीता मानधन प्रती माह रु. ५६५८/- तर माळी या पदाकरीता मानधन प्रती माह रु. ४९२०/- राहील.
वसतीगृहातील पदांकरीता माजी सैनिक पत्नी/विधवा यांचेकडुन दि. २० जुलै २०२० रोजी १२ वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रासहीत अर्ज मागविण्यात आले आहे. पदभरतीकरीता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी अर्जदारांनी दि. २८जुलै रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अकोला येथे सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व कागदपत्रासह उपस्थित रहावे. तरी इच्छुकांनी अर्ज कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी(प्रभारी) बाबासाहेब गाढवे यांनी कळविले आहे.अधिक माहितीकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अकोला येथील दुरध्वनी क्रमांक 0724-2433377 व अधिक्षक सैनिकी मुलांचे वसतीगृह, अकोला येथील दुरध्वनी क्रमांक 0724-2456062 वर संपर्क साधावा.