मूर्तिजापूर (सुमित सोनोने ): तालुक्यातील लाखपुरी येथे दिनांक – ३० ला रात्री १० नंतर खुप मोठ्या प्रमाणात मुसळदार पाऊस झाल्यामुळे लाखपुरी मध्ये ब-याच घरात पाणी घुसले , पाणी एवढे घुसले की रात्र भर पाणी काढावे लागले काही नागरीक तर रात्र भर झोपले सुध्दा नाही .
यामध्ये देविदास कचरुजी बावणे रा- लाखपुरी यांच्या ङघरात खुप मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने अन्न धान्य मध्ये तादुळ , गहु, हरबरा दाळ , इ. पुर्ण पाण्यात होते .व इतर नागरिकांचे सुध्दा घरात पाणी शिरल्याने अन्न धान्य ईतर नुकसान झाले असुन त्यांनी प्रशासनाला विनंती केलेली आहे की त्यांच्या घरातील झालेले नुकसान आर्थिक मदत देण्यात यावी .व रस्ते व्यवस्थीत नसल्यामुळे प्लॉट पुर्ण किचळमय झाले आहे. प्रशासनाकडुन लाखपुरी प्लॉट मधील रस्ते कधी होणार अशी नागरीकांची मागणी आणि प्लॉटमधील रोड डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिंककडुन होत आहे.