अकोला,दि.२- हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार येत्या दि.५ पर्यंतच्या कालावधीत अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, वारा, वादळ, विज पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. तरी संबधित अधिकारी/कर्मचारी/मंडळ अधिकारी/तलाठी/ग्रामसेवक कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना आपले मुख्यालयी उपस्थित रहावे. तसेच पूरबाधित क्षेत्रातील लोकांची योग्य ती दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.