तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा शहरातील गौतमा नदीला आलेल्या पुरामुळे नदी काठावरील वस्तीत नदीचे पाणी शिरल्याने काही कुटुंबवासीयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अश्या अत्यंत हालाकीच्या परिस्थिती जीवन जगणाऱ्या कुटूंबियांना शिवसेनेच्या वतीने राशन धान्य देऊन मदत करण्यात आली तसेच त्यांना तात्काळ शासनाने आर्थिक मदत करावी या करिता तहसीलदार यांना भेटून मागणी करण्यात आली.
हल्ली कोरोनाचे भले मोठे संकट ओढवलेलं आहे अशातच शहरातील गौतमा नदीला दि 30 जून ला मध्यरात्री अचानक पूर आल्याने नदी काठच्या गरीब कुटूंबाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे .या कुटूंबियांचे घरातील राशन धान्य , कपडे, भांडे ,दैनंदिन साहित्य, कोंबड्या ,बकऱ्या , नदीच्या पुरात वाहून गेल्याने हे कुटुंबे उघड्यावर आली आहेत .त्यामुळे या कुटूंबाचे हाल सुरू आहेत .या कुटुंबांना मदतीचा हाथ म्हणून शिवसेना युवसेनच्या वतीने राशन धान्य देऊन मदतीचा हाथ पुढे करण्यात आला आहे .त्याच बरोबर तेल्हारा तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन सादर करून या कुटूंबाना त्वरित मदत करण्याची मागणी शिवसेना युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी निवेदनावर शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड ,शिवसेना शहर प्रमुख , विक्रांत शिंदे , युवासेना जिल्हा प्रवक्ता सचिन थाटे,पप्पूसेठ सोनटक्के,निलेश धनभर ,प्रवीण वैष्णव ,रामा फाटकर,राजेश वानखडे,शाम जिंदे, दिलीप पिवाल,सुरज देशमुख,प्रज्वल मोहोड, स्वप्नील सुरे,अजय गावंडे, अक्षय गावंडे,शैलेश ढाके,मनोज सोनोने,चेतन गावंडे,गोपाल ङोईफोडे, अंकुश आठवले ,शुभम बोदडे,आकाश व्यवहारे,विनीत युतकार, मनोज चाफे,सुरज मजोडकर,दीपक गावत्रे, संभाजी वानखडे,इत्यादी शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.