• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, October 16, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

व्यवसाय सुलभतेसाठी वस्तू आणि सेवा कर प्रशासन अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा- अर्थमंत्री

City Reporter by City Reporter
July 2, 2020
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
78 1
0
Nirmala Sitaraman
12
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

1 जुलै 2020 रोजी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या देशभरातील सर्व कार्यालयांमध्ये तिसरा जीएसटी दिन साजरा करण्यात आला. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत येणारे अडथळे दूर करण्यासाठी जीएसटी अत्यंत उपयुक्त ठरले असून, ‘एक देश एक कर’ ही बाजारपेठ निर्माण करण्याचे उद्दिष्ट यातून साध्य होत आहे. सध्या कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, या दिवसानिमित्त, बहुतांश भागधारकांशी चर्चा आणि कार्यक्रम डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन आभासी स्वरूपात घेण्यात आले.

केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री, निर्मला सीतारामन, जीएसटी दिनानिमित्तच्या संदेशात म्हणाल्या की, जीएसटी कर प्रशासन व्यवस्था अधिक सुलभ करण्याच्या बाबतीत आतापर्यंत बरेच मोठे काम करण्यात आले असून, हितसंबंधी गट आणि व्यक्तींच्या सूचना समजून घेत, त्यानुसार, अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत, मात्र, देशात व्यवसायसुलभता निर्माण करण्यासठी कर रचना आणखी सोपी करण्याची गरजही त्यांनी यावेळी अधोरेखित केली.अर्थमंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:-

  • आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेवर भर देणे.
  • जीएसटी करदात्यांसाठी, करप्रशासन व्यवस्था अधिक सुलभ करत देशात उद्योगसुलभ वातावरण निर्माण करण्यावर भर देणे.
  • व्यापारी-उद्योजकांना भविष्यात येऊ शकणाऱ्या अडचणींचा अंदाज बांधत, त्या सोडवण्यासाठी आधीच पावले उचलणे.

कोविड-19 च्या संकटकाळात सीबीआयसीच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्षमतेने पार पाडलेल्या जबाबदाऱ्यांबाबत, अर्थमंत्र्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. करदात्यांना मदत करण्यासाठी या काळात अधिकाऱ्यांनी अनेकदा चाकोरीबाहेर जाऊन पावले उचलली, असे त्या म्हणाल्या. तसेच, करदात्यांना रोखीची उपलब्धता व्हावी, यासाठी विक्रमी संख्येने करपरतावे दिल्याबद्दलही त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या संदेशात म्हटले की, जीएसटी करविवरणपत्र भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली जावी, तसेच इनपुट टॅक्स क्रेडीटला परवानगी देण्याची प्रक्रियाही जलद गतीने राबवायला हवी. टाळेबंदीदरम्यान, सीबीआयसी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमांचे तसेच, माहिती तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मचा वापर करत, जीएसटी परताव्याची प्रक्रिया जलदगतीने राबवल्याचे ठाकूर यांनी कौतुक केले. त्याशिवाय, या काळात अडचणीत असलेल्या लोकांना मदत करत सामाजिक जबाबदारीने काम केल्याबद्दल देखील त्यांचे कौतुक करण्यात आले.

सीबीआयसीचे अध्यक्ष एम अजित कुमार, यांनी जीएसटी दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना, करदात्यांना मदत करणे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचावे, अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली. अर्थमंत्र्यांच्या उद्योगपूरक वातावरणनिर्मितीच्या संदेशाच्या दिशेने काम केले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Previous Post

अकोटात कोरोनाचा वाढता प्रभाव अन सात दिवसांचा जनता कर्फ्यु, नागरिकांनी पुढाकार घेऊन जनता कर्फ्युस सहकार्य करा पालकमंत्री बच्चू कडूचे आवाहन

Next Post

मेक्सिकोत व्यसनमुक्ती केंद्रावर हल्ला; २४ ठार

RelatedPosts

Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
अग्निवीर योजनेत होणार महत्त्वपूर्ण बदल! भारतीय लष्कराचा प्रस्ताव
Featured

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

October 10, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 1, 2025
स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
Featured

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी
Featured

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

July 25, 2025
तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन
Featured

तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन

July 24, 2025
Next Post
mexico-24-death

मेक्सिकोत व्यसनमुक्ती केंद्रावर हल्ला; २४ ठार

yashomati-thakur-amravati2-jluy

साथरोगावर नियंत्रणासाठी पेयजल स्त्रोतांची शुद्धता तपासावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

अग्निवीर योजनेत होणार महत्त्वपूर्ण बदल! भारतीय लष्कराचा प्रस्ताव

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

October 10, 2025
सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम

October 14, 2025

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.