अकोट (देवानंद खिरकर)- अकोट शहर व तालुक्यात असल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी अकोट पंचायत समिती सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठक ला सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी नेते मंडळी तसेच नगरसेवक व्यापारी संबंधित अधिकारी व प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती. यावेळी बच्चू कडू यांनी आकोट शहर व तालुक्यात करोना संक्रमण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली. स्थानिक नेतेच जर गंभीर नसतील तर जनता गंभीर कशी होणार हा प्रश्न यावेळी उपस्थित केला. कोरोना हरवण्याचे असेल तर एकजूट आवश्यक आहे. करोना संक्रमण अंकुश लावण्यासाठी 3 ते 9 जुलै पर्यंत दिवसांचा जनता कर्फ्यू आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत त्यांनी जनतेची सहकार्याचे आवाहन केले आहे. यावेळी पालकमंत्री बच्चू कडू,उपविभागिय अधिकारी,तहसीलदार,सर्व राजकिय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.