कोरोना अलर्ट
आज गुरूवार दि.२ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-२१३
पॉझिटीव्ह अहवाल-१९
निगेटीव्ह-१९४
अतिरिक्त माहिती
आज सकाळी १९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दहा महिला असून अन्य नऊ पुरुष आहेत. त्यातले दोन जण तेल्हारा येथील,दोन जण खदान,दोन जण गुळजारपुरा, दोन जण हरिहर पेठ,दोन जण अकोट फ़ैल येथील तर उर्वरित वाशीम रोड,गाडेगाव,खैर मोहम्मद प्लॉट,मलकापूर जि. बुलडाणा, हातरून, आळशी प्लॉट,काला मारोती,अकोट व हामजा प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान काल रात्री उपचार घेतांना तेल्हारा येथील रहिवासी असलेल्या एका ६५ वर्षीय स्त्री रुग्णाचा मृत्यू झाला. ही महिला दि.२९ जून रोजी दाखल झाली होती. तिचा काल मृत्यू झाला. तिचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १५८७
मयत-८१ (८०+१), डिस्चार्ज-११६५
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३४१
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!