अकोला,दि.१-आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे २१२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १९४ अहवाल निगेटीव्ह तर १८ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १५६८ झाली आहे. आज दिवसभरात २० रुग्ण बरे होऊन घरी गेले.तर एकाचा उपचार घेतांना मृत्यू झाला आहे. आजअखेर ३२३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण ११२४९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १०८८८, फेरतपासणीचे १४४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २१७ नमुने होते. आजपर्यंत एकूण १११६४ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ९५९६ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १५६८ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज १८ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात १८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात तीन महिला व आठ पुरुष असून त्यातले चार जण अकोट येथील, दोन जण गवळीपूरा तर उर्वरित मोठी उमरी, कैलास नगर, डाबकी रोड, जेल क्वार्टर व बार्शी टाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला असून अन्य सहा पुरुष आहेत. त्यातले तिघे डाबकी रोड येथील तर अन्य जुने शहर, पोळा चौक, मोठी उमरी, रजपुत पुरा येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
२० जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० तर कोविड केअर सेंटर मधून १० अशा २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून घरी सोडण्यात आलेल्या १० जणांपैकी दोन जण अशोक नगर, दोन जण गुलजार पुरा येथील तर उर्वरित बाळापूर, लहान उमरी, खदान, धोबी खदान, इंदिरा नगर, रामदास पेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. तर १० जणांना कोविड केअर सेंटर मधून घरी सोडण्यात आले. त्यात पाच जण अकोट फैल येथील , दोन जण पातूर येथील तर उर्वरीत गितानगर, गंगानगर व गुलजारपुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,असे कोविड केअर सेंटर मधून कळविण्यात आले आहे.
एक मयत
आज दुपारी उपचार घेतांना पातुर येथील रहिवासी असलेल्या एका ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण दि.२४ जून रोजी दाखल झाला होता. त्याचा आज मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
३२३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण १५६८ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ८० जण (एक आत्महत्या व ७९ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ११६५ आहे. तर सद्यस्थितीत ३२३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.












