तेल्हारा (प्रतिनिधी)- नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या लोकजागर मंच या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त ४६ रक्तदात्यांनी रक्तदान देऊन एक अनोखी भेट त्यांच्या चाहत्यांनी यावेळी दिली.
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेडचे भूमिपुत्र तसेच लोकजागर मंच या संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर राहून समाजकार्य करणारे शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांच्या अनेक समस्या सोडवून मदतीचा हात देणारे लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना या महामारीमुळे राज्यात रक्ताचा अपुरा पडलेला रक्तसाठा ह्या दृष्टीने लोकजागर मंचाच्या वतीने दि १ जुलै रोजी स्थानिक भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे सकाळी ११ वाजता भव्य रक्तदान व फळभाज्या बियाण्यांचा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी ४६ रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये ऍड.सुधाकर खुमकर ,विलास बेलाडकर निलेश जवकार ,अविनाश बगले, अर्जुन गाडगे,योगेश जायले, प्रमोद वाकोडे, सुनिल धुरडे, शिवा दिडोकार,बजरंग वारकरी, राजेश काटे,संतोष गावंडे,रोहीत गावंडे,ज्ञानेश्वर गावंडे,पुरूषोत्तम जायले,पवन कोलीसंकेत, रितेश पिवाल,आशिष पिवाल, राजेश ढोले ,रामकृष्ण डाबेराव, मंगेश गावंडे ,किशोर ताथोड ,माधव फोकमारे ,संजय सावरकर ,विनोद शित्रे,तूषार गावंडे ,राहुल गावंडे राजेश ताथोड, सोनु भोसले अंकुश सपकाळ ,भारत दामोदर शिवहरी भाकरे ,गजानन कडु आशिष उकलकार ,अर्जुन गाडगे ज्ञानेश्वर बहाकर ,आशिष बेलाडकर ,ज्ञानेश्वर बेलाडकर सागर गलसकार ,दिलीप पिवाल डॉ महेश खोट्टे,शुभम सोनोने,गजानन मते,सोनू वानखडे,निखिल भड,गुरुदेव ईसमोरे यांनी रक्तदान करून त्यांच्या वाढदिवशी अनोखी भेट दिली.
तसेच वाढदिवसानिमित्त आठशे शेतकऱ्यांना फळभाज्या बियाण्यांचा वाटप करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन कोरोनामुळे वाढदिवशी १० शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर बियाणे पोच करण्यात येणार असल्याचे सांगितले.यामध्ये यावेळी या दहा शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले शेख मुनीर शेख सत्तार घोडेगाव, राहुल चतारे शेरी,नारायण गावंडे माळेगाव, ओंकार तायडे माळेगाव ,रवि हागे तेल्हारा, विजय ढोले घोडेगाव ,प्रशांत दांदले दानापुर ,श्रुषिकेश हागे दानापुर ,राजेश ताथोड घोडेगाव, मनोहर खोटरे खापरखेड यांना बियाणे वाटप करण्यात आले.
कोरोना या महामारीमुळे अनेकांच्या हाताला काम नसल्याने अशातच अपंग व्यक्तीना मदतीचा हात समोर करून वाढदिवशी शहरातील जवळपास २० अपंग बांधवाना अन्नधान्य वाटप करण्यात आले.
यावेळी रक्तदान शिबिराला लोकजागर मंचचे कार्याध्यक्ष सुधाकर खुमकर,सचिव पुरुषोत्तम अवारे,भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय चौधरी,तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी लोकजागर मंचाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.