तेल्हारा (प्रतिनिधी)- दहिगाव शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी बीज निरीक्षक कृषी अधिकारी प,स,तेल्हारा येथे सोयाबीन बियाणे शेतात न निघाल्या बाबत तक्रारी कल्या होत्या त्या तक्रारची दखल घेत कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन सोयाबीन न निघालेल्या शेतात महेश खंडाळकर ,किशोर अवताडे हरिविजय आकोते यांच्या शेतात पाहणी केली. त्या मध्ये बियाणे मध्ये उगमशक्ती कमी,पावसाचा खंड,बियाणे खोल या तीन बाबी मूळे सोयाबीनचे बियाणे कमी उगवले असल्याचे मत अधीकारी यांनी व्यक्त केले.या निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियांना मुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.त्या पाहणी साठी तालुका कृषी अधिकारी मिलींद वानखडे,मंडळ कृषी अधिकारी कु,ए,बी,पचारने, पोलीस पाटील अरविंद अवताडे, कृषी सहाय्यक कु,ए,आ,डाबेराव,राऊत, समुह सहाय्यक नंदू अगडते,शेतकरी हजर होते.