बोर्डी (देवानंद खिरकर )- अकोट तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेले दनोरी पनोरी गावाला जोडणारा पठार नदीवरील पुल पहिल्याच पाण्यात खरडून गेल्यामुळे पनोरी गावातील लोकांचा संपर्क तुटला आहे.गेल्या १ महिना आधी या पुलावर प्रशासना तर्फे खड्डे मध्ये फक्त मुरूम टाकण्यात आला होता.परंतु खाली माती टाकून वर तात्पुरता देखावा म्हणून मुरूम पसरवण्यात आला आहे.तो पुल पहिल्याच पावसाने वाहून गेला.आमदार साहेबांना जी.प.सदस्यांना गावातिल लोकांनी भेटून सांगितले की पुलाची दखल घ्यावी नाहीतर गावातिल लोकांचा संपर्क तुटणार पुलाकडे लक्ष द्यावे.तरी सुध्दा त्यांनी दुर्लक्ष करीत आले.गावातील लोकांना बाहेर निघायला दुसरा पर्यायी मार्ग उपलब्ध नाही.गावातील लोकांच्या समस्या जर उध्दभवल्या तर गावातिल लोक हे गावाबाहेर सुधा जाऊ शकत नाही.यावर प्रशासनाने लक्ष द्यावे.आणि पनोरी गावाला ह्या अडचणीतून बाहेर काढण्यास पर्याय द्यावा.अशी मागणी पनोरी येथिल कोळी महासंघ जिल्हा कार्यकर्ता गणेश बुटे,प्रभाकर बुटे,प्रवीण फुकट,गोकुळ बुटे,कुरुमदास बुंदे,बाळू भदे,विलास बुटे,दादाराव बुटे यांच्या कडून होत आहे.