अकोला(प्रतिनिधी)- औरंगाबाद िजल्हयात काेराेना िवषाणूचे रुग्ण अािण मृत्यू वाढतच असल्याने याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर दै.दिव्य मराठीच्या विराेधात गुन्हा दाखल करणे म्हणजे माध्यामांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे अाहे, अशी टिका िवराेधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत केली. िजल्ह्यात काेराेना िवषाणूचा कहर वाढतच असून, या पृष्ठभूमीवर पाहणी करण्यासाठी फडणवीस सोमवारी जिल्हा दौऱ्यावर हाेते.
सध्या महािवकास अाघाडी सरकारच्या काळात राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्त्यांवर कारवाईचा सपाटाच सुरु करण्यात अाला अाहे. अाता
अाैरंगाबाद िजल्हयात काेराेना िवषाणूचे रुग्ण अािण मृत्यू वाढतच असल्याने याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर दै.दिव्य मराठीच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला. ही तर माध्यमांची मुस्कटबीच अाहे, असे फडणवीस म्हणाले. पत्रकार परिषदेला केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे, अामदार गाेवर्धन शर्मा, अा. रणधिर सावरकर ,अा. डाॅ. रणजित पाटील अादींसह भाजपचे अनेक नेते उपस्थित हाेते.
पत्रकारांनी िदले िनवेदन
अाैरंगाबाद येथे दै.दिव्य मराठीच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात अाल्याने साेमवारी पत्रकार संघटना कृती समितीने िवराेधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना िनवेदन िदले. झालेली कारवाईची चुकीची असून हा मुद्दा लावून धरु, असेही ते म्हणाले. या निवेदनानुसार सरकारी यंत्रणेमध्ये जे काही सुरू आहे ते विविध कोनातून जनतेसमोर मांडणे हे पत्रकारांचे कर्तव्यच. सत्याच्या शोधार्थ विविध मुद्दे, माहिती, तपशील यांची उलटतपासणी करणे हे माध्यमांचे कामच आहे. ते सरकारी यंत्रणांना अप्रियही वाटेल. मात्र, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली माध्यमं ही लोकांना उत्तरदायी असल्याने ते आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडीत आहेत. सध्याच्या कोरोना संकटात माध्यमही फ्रंटवर येऊन कोरोना योद्ध्यांप्रमाणे लढत आहे. मात्र, त्यांच्यावरच अशा पद्धतीने फौजदारी कारवाई करणे हे क्लेशदायक व संतापजनकच म्हणावे लागेल, असेही निवेदनात नमूद करण्यात अाले अाहे.