हिवरखेड (बाळासाहेब नेरकर)– मागिल 5 वर्षात आशा व गट प्रवर्तक या जिल्हा स्तरिय व राज्यस्तरीय सतत रस्त्यातील आंदोलन करीत होती ,त्यानंतर मागील वर्षि 3 सप्टेंबर ला राज्यव्यापी संप आशा व गातप्रवर्तक संघटनेने केला तेव्हाच्या सरकारने 16/9 /2019 ला आशा वर्कर यांचे 2000 मानधन शासनाने वाढवले पण नंतर शासन बदलले व तो जी आर अमलात आलाच नाही 2020 मध्ये संघटनेने कोरोना महामारीत लॉक डाउन असताना आशा व गातप्रवर्तक यांनी काळ्या फीती लावून कोरोणा उद्रेक मध्ये काम करीत आपल्या हक्कासाठी आंदोलन राज्यभर छेडले अकोला व वाशिम जिल्ह्यामधूनही आमदारांना मागण्याचे निवेदन सौ सध्यांताई पाटील यांचे नेतृत्वात तालूका गातप्रवर्तका व आशा संघटनेकडुन तेल्हारा तालूका अध्यक्ष मिनाताई वानखडे व अकोट तालूका अध्यक्ष सौ ऊज्वला दे. डोबाळे आशा सघटनेच्या पदाधिकारी यांचे हस्ते निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले त्यानंतर शासनाने आशा ना देऊ म्हटले व गातप्रवर्तक ताईसाठी 4 महिन्याचा अवधी आंदोलक कृती सघटनेकडे मागीतला होता.
पण गतप्रवर्तक यांचे मानधन वाढले नाही यावर संघटनेकडुन राज्यातील 72 हजार आशा संपावर जातील असा इशारा दिला होता, परिणामी शासनाने 26 जून रोजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सोलापुर येथे काॅम्रेड सलिम पटेल काॅम्रेड पुष्पा पाटिल महाराष्ट आशा गटप्रवर्तक फेडरेशन व आशा कर्मचारी यांनी आरोग्यमञ्याची भेट घेतली व सदरवाढ १ जूलै२०१९ आशाना देण्याचे निवेदन ही दिले तर आरोग्यमञायांनी2000 हजार व गातप्रवर्तकना 3000 मानधन वाढ 1 जुलै पासून देण्याचे कबूल केले आहे .
आशाच्या या प्रदीर्घ लढ्याला यश आले असून त्या परत नव्या उत्साहाने आपले काम करीत आहेत पण तरीही शासनाने त्यांना कायम सेवेत सामावून घेणे गरजेचे आहे कारण आशा या आरोग्य यंत्रणेचा मजबूत 4 था स्थंभ आहेत
तरी आमच्या लढ्याला यश आले व आमचे मानधनात शासनाने वाढ केल्या बद्दल आम्ही शासनाचे आभारी असल्याचे सघंटनेच्या पदाधिकार्यानी सांगितले.