अकोला,दि.२७- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी पासेस देण्यात येणार नाहीत, तरी कोणिही पंढरपूर येथे जाण्यासाठी पासेसची मागणी करु नये असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
यासंदर्भात विभागीय आयुक्त पुणे यांचे निर्देशानुसार पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर, आषाढी एकादशी दरम्यान पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आले आहे, याबाबत जिल्हाधिकारी यांचे नावे पत्र पाठवून, पंढरपूर येथे दर्शनाकरिता पासेस देण्यात येऊ नये, किंवा नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येऊ नये असे कळविण्यात आले आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणी पासेस ची मागणी करू नये, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारच्या पासेस देण्यात येणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भाविकांना केले आहे.
अधिक वाचा : मूर्तीजापुर तालुक्यात पुन्हा कोरोनाची एन्ट्री,प्रशासन प्रशासन लागले कामाला