अकोला,दि.२७ – आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे २७० अहवाल प्राप्त झाले. त्यातील २१३ अहवाल निगेटीव्ह तर ५७ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १४२१ झाली आहे. आजअखेर ३०० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण १००२१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ९६७०, फेरतपासणीचे १४३ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २०८ नमुने होते. आजपर्यंत एकूण ९९९२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ८५७१ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १४२१ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज ५७ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात ५७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यातआज सकाळी ४२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १९ महिला व २३ पुरुष आहेत. त्यात हरिहरपेठ येथील सहा, अकोट फैल येथील पाच, समर्थनगर पातूर येथील चार, न्यू राधाकिसन प्लॉट, सिंधी कॅम्प, आंबेडकर नगर येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड येथील दोन तर आदर्श कॉलनी, सोनटक्के प्लॉट, बाळापूर रोड, कौलखेड, गंगानगर, गीतानगर, शिवर, शिवसेना वसाहत, गुलजारपुरा, कमलानगर, पोळा चौक, बार्शी टाकळी, मुर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोट व मंगळूरपीर वाशीम येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी १५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व नऊ पुरुष आहे. त्यातील सात जण हरिहर पेठ येथील, तिघे रजपूत पुरा येथील तर उर्वरित डाबकी रोड, हरिहर मंदिर, खडकी, बाळापूर व मंगळूरपीर जि. वाशीम येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
३०० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण १४२१ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ७४ जण (एक आत्महत्या व ७३ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १०४७ आहे. तर सद्यस्थितीत ३०० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.