अकोला,दि.२६- जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भाव सद्यस्थितीबाबत आज सायंकाळी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अष्टपुत्रे, डॉ. शिरसाम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, डॉ. राठोड, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे आदी उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्त यांनी जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढ, मृत्यू संख्या वाढ या संदर्भात आढावा घेतला. उपचारांच्या पद्धतीत तसेच उपचार सुविधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. शहरातील पॊझिटीव्ह रुग्णांचे संपर्क तपासणी यावर अधिक भर देऊन, अन्य व्याधीग्रस्त व संपर्कातील जोखमीच्या लोकांच्या चाचण्या लवकरात लवकर होतील यादृष्टिने नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या ३६ व्हेंटीलेटर यंत्रांना लवकरात लवकर कार्यान्वित करावे, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. तसेच ज्या रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे अशा रुग्णांचाही दैनंदिन फॉलोअप १४ दिवस पर्यंत घ्यावा, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. रॅपिड टेस्ट किट खरेदीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करुन अधिकाधिक संदिग्ध व्यक्तिंच्या चाचण्या करण्याचे नियोजन करा, असे निर्देशही त्यांनी दिले.
अधिक वाचा : राजर्षि छत्रपती शाहू महाराजांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन