मूर्तीजापुर (सुमित सोनोने):- येथील मूर्तीजापुर बसस्थानकाचे अर्धवट विकासकामे पुर्ण करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दूबे यांनी निवेदनं द्वारे पालकमंत्री बच्चु कडू व विधान परिषद सदस्य आ गोपीकिशन बाजोरीया यांना दिला आहे.
मुर्तीजापुर बसस्थानकाचा मागील वीस वर्षापासून कोणत्याही प्रकारचा विकास काम झालं ना होता. यासंदर्भात माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी पाठपुरावा करून आ गोपीकिशन बाजोरिया यांचे प्रयत्नाने सदर बस स्थानकाची रंगरंगोटी पूर्ण झाली याबद्दल आमदार बाजोरिया यांचे आभार व्यक्त करण्यात आले होते आता याच ठिकाणी अर्धवट काम असल्याने आवश्यक असलेल्या ठिकाणी पाण्याची बोर करणे अनिवार्य आहे. याठिकाणी कायमस्वरूपी पाणपोई आहे परंतु या ठिकाणी प्रवाशांना पिण्यासाठी योग्य पाणी मिळत नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या परिस्थिती महामारी ची असून ही बाब गंभीर असून सर्व सुविधा होणे आवश्यक आहे. तसेच शौचालय सुद्धा बांधण्यात यावे तसेच बस स्थानक परिसराचे रस्त्याचे सर्व डांबरीकरण मजबुतीने करावे जेणेकरून कोणतेही खड्डे निर्माण होणार नाही. आता स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्या कारणामुळे आत मध्ये सुद्धा किरकोळ अपघात घडत आहे जे काही अर्धवट काम राहिलेला आहे ते पूर्ण करण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले आहे तातडीने अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी दिलेले एजन्सीला आदेश देण्यात यावे. मुर्तीजापुर बसस्थानकाचे कामकाजाची पाहणी करण्यात आली आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे सामाजिक कार्यकर्ता संदीप जळमकर,कैलास महाजन ,देविदास गोळे उपस्थित होते.