• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 15, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home कोविड १९

३१० अहवाल प्राप्तः ६५पॉझिटीव्ह, चार मयत, ७९ डिस्चार्ज

Team by Team
June 24, 2020
in कोविड १९, Corona Featured, Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
corona
13
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. २४ -आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ३१० अहवाल प्राप्त झाले. त्यातील २४५ अहवाल निगेटीव्ह तर ६५ अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान आज दिवसभरात चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर आज दिवसभरात ७९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १३०९ झाली आहे.आजअखेर ३३३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण ९२८१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ८९४२, फेरतपासणीचे १३८ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २०१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ९१८२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ७८७३ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १३०९ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आज ६५ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात ६५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी प्राप्त अहवालात ५४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १८ पुरुष रुग्ण हे जिल्हा कारागृहातून संदर्भित आहेत. उर्वरित ३६ जणांमध्ये १४ महिला आहेत. तर २२ पुरुष आहेत. त्यात एका तीन महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. यातील सात जण तारफैल, सात जण न्यू तारफैल, दगडीपुल येथील चार जण, खदान येथील दोन जण, बाळापूर येथील दोन जण, तर उर्वरित बार्शी टाकळी, कामा प्लॉट, सिंधी कॅम्प, रामदास पेठ, सिव्हील लाईन, शिवर, जीएमसी होस्टेल, कळंबेश्वर, जळगाव जामोद, लहान उमरी, कान्हेरी गवळी, सिद्धार्थ नगर, आदर्श कॉलनी, परदेशीपुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी प्राप्त अहवालात ११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. ते खदान, शौकतअली चौक, आदर्श कॉलनी, आळशी प्लॉट, देशमुख फैल, लकडगंज, जुना तारफैल, बोरगाव मंजू, शंकरनगर, बार्शी टाकळी आणि वाशिम येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

चौघांचा मृत्यू

दरम्यान काल (दि.२३) रात्री तीन व आज दुपारी एक असे चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात सोनटक्के प्लॉट येथील ७० वर्षीय पुरुष असून ते दि.१२ रोजी दाखल झाले होते. अन्य एक डाबकी रोड येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्ण असून हे दि.९ रोजी दाखल झाले होते. तर कामा प्लॉट येथील ८० वर्षीय महिला रुग्ण असून ही महिला दि.२१ रोजी दाखल झाली होती. तर आज दुपारी मयत झालेला रुग्ण बाळापूर येथील ४३ वर्षीय पुरुष असून ते दि.९ रोजी दाखल झाले होते. त्यांचा आज दुपारी उपचार घेतांना मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

७९ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ३४ जणांना व डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात स्थापण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर येथून ४५ जणांना, असे आज एकूण ७९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या ३४ रुग्णात सिंधी कॅम्प येथील पाच, बाळापुर येथील तीन, तर खदान, जीएमसी क्वार्टर, मलकापूर, तारफैल, डाबकी रोड, जुने शहर येथील प्रत्येकी दोन जण, तर शंकर नगर, सिंदखेड ता.बार्शी टाकळी, अशोक नगर, माळीपुरा, कळंबी महागाव, कान्हेरी गवळी, दहिहांडा, पातूर, गुलशन कॉलनी, हिंगणा, पवनपुत्र अपार्टमेंट, हरिहरपेठ, चांदुर आणि सिटी कोतवाली येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

तर कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या ४५ रुग्णांत खदान येथील आठ, सिंधी कॅम्प येथील तीन, देवी खदान येथील तीन, चांदुर खडकी येथील दोन, खडकी येथील दोन, आदर्श कॉलनी येथील दोन, कैलास टेकडी येथील दोन, काला चबुतरा येथील दोन, हनुमान बस्ती दोन आणि सिटी कोतवाली येथील दोन तर शिवनी, हरिहरपेठ, शिवाजीनगर, न्यु तापडीया नगर, चैतन्य नगर, जठारपेठ, सालासार मंदिराजवळ, टॉवर चौक, शिवर, गुलजारपुरा, देशमुख फैल, पक्कीखोली, पातूर, तार फैल, रामदास पेठ, डाबकी रोड, बिर्ला कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती कोवीड केअर सेंटर येथून देण्यात आली.

३३३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत १३०९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ७१ जण (एक आत्महत्या व ७० कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ९०५ आहे. तर सद्यस्थितीत ३३३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Tags: अकोलाकोरोनाकोविड १९
Previous Post

कोवीड १९ आढावा बैठक जलद चाचण्यांसाठी रॅपिड टेस्ट किट खरेदी करा- पालकमंत्री ना. कडू यांचे निर्देश

Next Post

राज्यात २३.६० लाखांपेक्षा जास्त शिवभोजन थाळ्यांचे तर ४७.९३ लाख क्विंटल धान्य वाटप

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Shiv Bhojan Thali

राज्यात २३.६० लाखांपेक्षा जास्त शिवभोजन थाळ्यांचे तर ४७.९३ लाख क्विंटल धान्य वाटप

Salman Khan

सुशांत सिंह राजपूतप्रकरणी सलमानची पाठराखण करणं अभिनेत्याला पडलं महागात

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.