• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 15, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कोवीड १९ आढावा बैठक जलद चाचण्यांसाठी रॅपिड टेस्ट किट खरेदी करा- पालकमंत्री ना. कडू यांचे निर्देश

Team by Team
June 24, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा, कोविड १९
Reading Time: 1 min read
79 1
0
पालकमंत्री
25
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२४- जिल्ह्यातील संदिग्ध व्यक्तिंच्या अधिकाधिक चाचण्या जलद करता याव्यात यासाठी दहा हजार रॅपिड टेस्ट किट खरेदी करा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.

जिल्ह्यातील कोवीड १९ संदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुखी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, डॉ. एम डी. राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

यावेळी जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांच्या होत असलेल्या आरोग्य तपासण्या व थेट त्या त्या भागात जाऊन घशातील स्त्रावांचे संकलन यामुळे चाचण्यांची संख्या वाढत असल्याची माहिती देण्यात आली. येत्या काळात व्यक्तीचे वय, त्याला असणारे अन्य आजार यानुसार चाचणीचा प्राधान्य क्रम ठरवावा, अशी सुचना ना. कडू यांनी केली. ६० वर्षावरील वय, त्यासोबत मधुमेह, दमा, श्वसनाचे आजार, उच्च रक्तदाब इ. सारखे आजार असणे अशी लक्षणे असल्यास चाचण्या कराव्यात, असे निर्देश देण्यात आले. येत्या काळात चाचण्यांचा वेग वाढविण्यासाठी रॅपिड टेस्ट किट खरेदी करुन त्यामाध्यमातून लवकर चाचणीचा अहवाल मिळेल. त्यासाठी जिल्ह्यात चाचणी करण्यासाठी १० हजार रॅपिड टेस्ट किट खरेदी करण्याची प्रक्रिया राबवावी, असे निर्देश ना. कडू यांनी दिले.

यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. फारुखी यांनी सांगितले की, या टेस्ट किट मुळे अर्धा तासात चाचणी अहवाल मिळेल. तसेच वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता वाढीव बेडसची तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती ही यावेळी देण्यात आली. अकोला शहरात लोकांच्या आरोग्य तपासण्या व संदिग्ध रुग्णांच्या चाचण्या कमी कालावधीत पूर्ण करण्यासाठी नियोजन बद्ध पद्धतीने मोहिम राबवा, असे निर्देश ना. कडू यांनी दिले.

Tags: अकोलाउपजिल्हाधिकारी संजय खडसेकोविड १९पालकमंत्री ना. कडू
Previous Post

मुर्तिजापूर शहराची पाणीपुरवठा योजना पूर्ण करा- पालकमंत्री ना. बच्चू कडू

Next Post

३१० अहवाल प्राप्तः ६५पॉझिटीव्ह, चार मयत, ७९ डिस्चार्ज

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
corona

३१० अहवाल प्राप्तः ६५पॉझिटीव्ह, चार मयत, ७९ डिस्चार्ज

Shiv Bhojan Thali

राज्यात २३.६० लाखांपेक्षा जास्त शिवभोजन थाळ्यांचे तर ४७.९३ लाख क्विंटल धान्य वाटप

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.