• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, July 3, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पालकमंत्री उद्यमी ग्राम योजनेद्वारे ग्रामिण भागात उद्योगाला चालना- पालकमंत्री ना. बच्चू कडू

Team by Team
June 24, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
पालकमंत्री
12
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२४- ग्रामीण भागात छोटे उद्योग निर्माण करुन रोजगार निर्मिती करण्यासाठी जिल्ह्यात पालकमंत्री उद्यमी ग्राम योजना राबविण्यात येणार असून त्याद्वारे ग्रामिण भागात उद्योगाला चालना देऊ,असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणीक मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण व कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री ना.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पालकमंत्री उद्यमी ग्राम योजना याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विकास विभागाचे सु. रा. झळके, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तराणीया, निवासी उप जिल्हाधिकारी संजय खडसे यांची उपस्थिती होती.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील तीन गावांची निवड करण्यात येणार आहे. या गावांमध्ये छोटे-छोटे उद्योग उभारण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांना प्रशिक्षण व माहिती देण्यात येणार आहे. चांगल्या भावनेतून केलेले कार्यातून कुटीर उद्योग शेतीला पुरक व्यवसाय म्हणून गाव उद्योग पूरक गाव होवू शकते. यासाठी समर्पित भावना जिद्द व मेहनत करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री ना. कडू यांनी सांगीतले. दहा-वीस गावांना जोडून बहू उद्देशीय केंद्र तयार करता येवू शकते.

कोरोना संकटामुळे शहरातून गावाकडे आलेल्या कुशल कामगारांचा उपयोग करुन गावात उद्योग उभारणे शक्य आहे. यासाठी गावातील लोकांनी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगीतले. यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. यासाठी विविध विभागाच्या योजनांची सांगड घालून सुक्ष्म नियोजन करुन पालकमंत्री उद्यमी ग्राम योजना सफल होवू शकते असेही ते म्हणाले. यासाठी बँकांनी कर्ज पुरवठा प्रकरणे त्वरीत मार्गी लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगीतले.

ही योजना यशस्वी करण्यासाठी विदेशातून आलेले उद्योजक व पुणे, मुंबई येथून आलेले उद्योजक यांच्याशी संवाद साधून त्यांच्यासोबत विचारविनिमय करण्यात येईल असेही त्यांनी सांगीतले. बोरगाव मंजु येथील अगरबत्ती उद्योजक विजय रायबोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी केले.

Tags: अकोलापालकमंत्री ना.बच्चू कडू
Previous Post

कोविड-19 चाचण्यांनी प्रति दिन 2 लाखाचा टप्पा ओलांडला

Next Post

मोरगाव भाकरे सतरंजीचे गाव म्हणून नावलौकीक मिळवणार- पालकमंत्री ना. बच्चू कडू

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Bacchu Kadu_program held in village

मोरगाव भाकरे सतरंजीचे गाव म्हणून नावलौकीक मिळवणार- पालकमंत्री ना. बच्चू कडू

admission

शिक्षणाचा अधिकार अंतर्गत २५ टक्के प्रवेश; कागदपत्रांची पडताळणी शाळास्तरावरच

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.