अकोला,दि.२३- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे बुधवार दि.२४ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
बुधवार दि.२४ रोजी-
सकाळी १० वा. मुर्तिजापूर येथे आगमन व गाडगे महाराज संस्थानास सदिच्छा भेट.
सकाळी ११ वा. मुर्तिजापूर येथील वसाहतीतील पाणीपुरवठा समस्येबाबत आढावा बैठक
दुपारी १२ वा. मुर्तिजापूर येथून मौजे मोरगाव भाकरे ता. अकोला कडे प्रयाण.
दुपारी एक वा. मोरगाव भाकरे ता. अकोला येथे एक गाव एक उद्योग अंतर्गत सतरंजी उद्योगास भेट.
दुपारी दोन वा. गाव तिथे उद्योग याबाबत आढावा बैठक, स्थळ- नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय.
दुपारी तीन वा. कोविड-१९ संदर्भात आढावा बैठक, स्थळ- नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय.
सायं. पाच वा. स्थानिक प्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्या समवेत भेट व चर्चा. त्यानंतर सवडीने मुर्तिजापूर-दर्यापूर मार्गे कुरळपूर्णा जि. अमरावती कडे प्रयाण.