तेल्हारा (तालुका प्रतिनिधी)- तेल्हारा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक 23 जून रोजी तेल्हारा तहसीलदारांना एक विस्तृत निवेदन सादर करण्यात आले असुन कर्जमाफी व पीक कर्जाच्या मागणीसाठी तालुक्यात ठिकठिकाणी पक्षातर्फे आंदोलन करण्यात येतील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे
शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे आणि कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करावी या मागणीसाठी पक्ष कार्यकर्ते बँकेसमोर निदर्शन करणार आहेत शासनाने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी केलेली नाही अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये व फळबागानां 50 हजार रुपये हेक्टरी देण्याची घोषणा सरकार विसरले आहे शेतकऱ्यांच्या कर्ज पुनर्गठन चुकीचे केल्याने अनेक शेतकरी कर्जमाफीची यासाठी अपात्र ठरते बँका व शासन शेतकऱ्यांच्या समस्या व तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहे याबाबत चौकशी करून दोषी बँकांवर कारवाई व शेतकऱ्यांना न्यायची मागणी निवेदनातून करण्यात आली निवेदनावर तेल्हारा तालुका भाजपा अध्यक्ष गजानन उंबरकार जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका तालुका सरचिटणीस धर्मेश चौधरी तालुका प्रसिद्धीप्रमुख रवी शर्मा महिला आघाडी तालुकाध्यक्ष मोनिका वाघ न प अध्यक्षा जयश्री पुंडकर जिल्हा परिषद सदस्या सुलभा दुतोंडे डॉ बाबुराव शेळके अनिल पोहणे तालुका संपर्कप्रमुख रमेश दुतोंडे विजय देशमुख भाजयुमो जिल्हा सरचिटणीस किरण अवताडे भाजयुमो शहराध्यक्ष गणेश इंगोले विलास पाथ्रीकर संजय बागडे सौरभ पाथ्रीकर अक्षय पदवाड अश्विन म्हस्के राहुल चोपडे विशाल कोकाटे यांच्यासह निवेदनावर भाजपा शहर तालुका कार्यकर्ता पदाधिकार्यांच्या सह्या आहेत.