मुर्तिजापूर (सुमित सोनोने)- बँकांमार्फत त्वरित कर्जवाटप व कर्जमाफी करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूर तर्फे दिनांक 22 जून रोजी दि.अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर निदर्शने व आंदोलन करण्यात आले. तसेच बँक अधिकाऱ्यांशी भेट घेऊन निवेदन देण्यात आले तसेच चर्चा करण्यात आली.
राज्यात कोरोनाचे संकट असले म्हणून पाऊस ,खरीप हंगाम आणि शेतीची कामे थांबत नाही राज्य सरकारचा बांधावर खते आणि बियाणे या योजनेचा बोजवारा उडाला आहे,पिककर्जाचे वाटप ठप्प झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे भाजपा मूर्तिजापूर तर्फे आमदार हरिषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.या आंदोलनावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भुषण कोकाटे, शहराध्यक्ष रितेश सबाजकर, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख, कमलाकर गावंडे, अमित कावरे, अविनाश यावले, राजू कांबे , शेतकरी आघाडी- प्रशांत हजारी, शेतकरी आघाडी- अनिल ठोकळ, हर्षल साबळे, अमोल पिंपळे,अमित नागवान, संदिप जळमकर, गजानन नाकट, सुमित सोनोने, राजू सदार, गजानन पोळकट,राजु इंगोले तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.