पातुर (सुनील गाडगे)- पातूर येथे जुन्या बसस्थानक जवळील शहाबाबू शाळेजवळ उभ्या रोडवर असलेल्या दोन मालवाहू ट्रक चे टायर आणि ट्रक मधील बॅटरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली असून रोडवर वाहन सुद्धा आता पातूर शहरात असुरक्षित असल्याचे या घटनेनंतर दिसून येते आहे.
याठिकाणी पातूर येथील माल वाहू ट्रक mh20 w 5523 मालक सै अजिज सै सादीक मुजावर पुरा पातुर आणि mh 14 az 0108मालक शे. मुखतार शे गफुर अस याे दोन वाहनातील जवळपास एकुण 45 हजारांचा माल 14 च्या राञीलंपास केला आहे हा प्रकार मालकाला सकाळी कळतांच मालकाने पातूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीवरून
अज्ञात आरोपी विरोधात 379 चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पातुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार गजानन ठाकूर यांच्या मारगदर्शनाखाली बिटजमदार चोकशी करीतअसल्याची माहिती मिळाली आहे तर या घटनेची तात्काळ कारवाई करावी अशी मागणी तक्रार कर्त्यानी केली आहे.