अकोला, दि. २२ : गाई- म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा लाभ सन २०२०-२१ करीता घेण्यासाठी पशुपालकांनी दि.१५ जुलै पर्यंत आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधून जातिवंत गाई व म्हशींचे अर्ज भरुन घ्यावेत. जास्तीत-जास्त पशुपालकांनी या योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. तुषार पांडुरंग बावणे यांनी केले आहे.