बोर्डी(देवानंद खिरकर) – अकोट तालुक्यातील गटग्रामपंचायत असलेले दनोरी पनोरी येथिल 1 ते 5 परंत असलेली जिल्हा परिषद शाळेची ईमारत ही शिकस्त झालेली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ढोरे सर, मुकुंदे सर मुख्याध्यापक यांनी ठराव दिला आहे.
परंतू आज परंत सुध्दा प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही. यामूळे पनोरी गावातिल विद्यार्थी दूसर्या गावामधे नाव टाकत आहेत. ह्यामुळे गावातिल शाळा ही बंद पडनार व गरिबाची मुले ही शिक्षणापासुन दुर राहणार अशी अवस्था झालेली आहे. करिता प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेवून पनोरी गावातील शिकस्त असलेली ईमारतीची दखल घ्यावी व नवीन ईमारत बांधकामाची परवानगी द्यावी. अशी मागणी पनोरी येथिल नागरिका कडून होत आहे.