पातूर (सुनिल गाडगे)- दि २१ जून रोजी पातूर पोलिस स्टेशन येथे पत्रकार सभा बोलावण्यात आली या सभेचं मुख्य उद्देश्य कोरोना विषयी जनजागृती करणे तसेच पातूर शहरात वाढत असलेल्या रुग्ण संख्येवर मात करण्यासाठी उपाय योजना म्हणून पत्रकार बांधव मार्फत जनजागृती व्हावी तसेच शासनाने दिलेल्या उपाय योजना व नियमांचे काटेकोर पणे अमल बजावणी व्हावी या साठी आज सभा घेण्यात आली.
पातूर शहरात कोरोनाचा वाढता प्रभाव बघता प्रशासनाने लागू केलेल्या नियम व अटी चे पालन काटेकोर पने व्हावे या साठी पोलिस प्रशासन कटिबध्द आहे तसेच पातूर शहरा मधील जनतेला प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात येते की कोणीही कामाशिवाय घरा बाहेर निघू नये विनाकारण मार्केट मध्ये गर्दी करू नये तसेच सोशल डीस्टांसिंग चे काटे कोर पने पालन करावे.
दिनांक २३/०६/२०२० पासून पातूर शहारा मधे वीणा कारण फिरणाऱ्या तसेच तोंडाला मास्क न बांधणाऱ्या व्यक्तीनं वर पोलिस कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येतील याची सर्व पातूर वासियानी दखल घ्यावी.पातूर शहरात मार्केट मध्ये असे दिसून आले की पातूर शहरातील जनता ही कोरोना आजार विषयी गंभीर दिसत नाही आहे नुसती मार्केट मध्ये विनाकारण गर्दी करत आहे तोंडाला मास्क न बांधता फिरत आहे. अश्या निष्काळजी पना मुळे पातूर शहरामध्ये कोरणा या घातक आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे..पातूर शहारामध्ये प्रशासन ने सम आणि विषम पद्धतीने दुकान उघडण्याच्या आदेशाची काही मुजोर दुकानदार पायमल्ली करत आहेत.
सम विषम नुसार दुकान बंद असताना दुकानं समोर उभे राहून तसेच ग्राहक आल्यास त्याला दुकानाचे शटर उघडून मालाची विक्री करत आहेत तसेच दुकानाच्या मागच्या गेट मधून मालाची विक्री करत आहेत मोबाईल विक्री सुद्धा करत आहेत हॉटेल मालक चहाचा वाटप करत आहेत अश्या मुजोर दुकान मालकानं वर तसेच हॉटेल मालकणावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सध्या लागू असलेल्या कलम १४४ नुसार गुन्हे सुधा दाखल करण्यात येतील याची नोंद प्रशासनाचे नियम मोडणाऱ्या लोकांनी तसेच मार्केट मधील दुकानदारांनी घ्यावी.. पातूर शहरांमधून कोरोना हद्द पार करायचा आहे तसेच जनतेने सावध राहून प्रशासनाला सहकार्य करायचे आहे पातूर शहरातील जनतेने कोरोना या घातक विषाणूची गंभीरता लक्षात घ्यावी असे आव्हान पातूर पोलिस स्टेशन चे नव्याने रुजू झालेल्या ठाणेदार संजय बायस(ठाकूर) यांच्या वतीने करण्यात येत आहे.